इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना मिळणाऱ्या योजना.

 

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना मिळणाऱ्या योजना.

1.शैक्षणिक 

 
 
या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

1.      बांधकाम कामगारांच्या इयत्ता 1ली ते इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना प्रतिवर्षी 2,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

2.       बांधकाम कामगारांच्या इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

3.       बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

4.       या योजनेअंतर्गत कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

5.       नोंदीत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता तसेच महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेशासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादींसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

6.       नोंदीत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षासाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते

7.       या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

8.       या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण करण्यात येते.

2. एमएस-सी आयटी (MSCIT) अर्थसहाय्य योजना

1.       योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची संपूर्ण रक्कम परत केली जाते. 

3. सामाजिक सुरक्षा योजना

1.      बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते

2.      नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहाकरीता 51,000/- रुपये अर्थसहाय्य मंडळातर्फे देण्यात येते.

3.      प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहिना 3,000/- रुपये इतकी पेन्शन रक्कम दिली जाते.

4.      बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत एखाद्या कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

5.      योजनेअंतर्गत कामगारांचा विमा उतरवला जातो जेणेकरून त्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाईल. या योजनेअंतर्गत कामगाराला महिना फक्त 1/- रुपये भरून 2 लाखांपर्यंत विम्याचा लाभ घेता येईल.

6.      इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत अटल पेंशन योजनेअंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर लाभार्थाला दरमहा 5,000/- रुपये पेन्शन मिळते.

 

4. बांधकाम कामगार घरकुल योजना:

1.      अंतर्गत कामगाराकडे कच्चे किंवा पडके घर असल्यास किंवा त्याची स्वतःची जमीन असल्यास घर बांधण्यासाठी ग्रामीण भागासाठी 1 लाख रुपये व नगरपरिषद क्षेत्रासाठी 1.50 लाख रुपये महानगर पालिका क्षेत्रासाठी 2 लाख रुपये व मुंबई महानगर प्रदेशासाठी 2 लाखाचे बांधकाम अनुदान देण्यात येत.

2.      योजनेअंतर्गत राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी  1.5 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

5. आरोग्य विषयक योजना

1.       नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीस नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

2.       कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर आजार झाल्यास त्याच्या वैद्यकीय उपचाराकरीता कमीत कमी 5,000/- रुपये ते जास्तीत जास्त 25,000/- रुपये पर्यंत आर्थीक लाभ दिला जातो.

3.       नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीस शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

4.       योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगार व त्याच्या कुटुंबांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

5.       एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे बँकेत 1 लाख रुपये ठेवले जातात व मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर सदर रक्कम मुलीला व्याजासकट दिली जाते.

6.       कामाच्या ठिकाणी कामगारास 75% किंवा कायम स्वरूपाचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

7.       कामगार आजारी पडून दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी 100/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

7.    नोंदीत बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येते.

8.    Contact  For  Online Application:-

9.       Shree Computer Services

10.   Suraj Girish Shende

11.   Contact Or Whatsapp – 9067754259

12.   Email- suryanshshende@gmail.com

13.   Website –  https://shreecomputergadisurla.blogspot.com/

14.   9067754259/SHREE COMPUTER  SERVICES

15.   👉Please Join us For letest updates

16.   👇👇👇👇

17.   🟣Whatsapp Group-

18.   https://chat.whatsapp.com/H3wUwSDeNR1Le4iC0v5zEe

19.   ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- https://wa.me/message/HVAU6Q46CXIXN1CLICK HERE

20.    

21.     वाचकहो, 'SHREE COMPUTER SERVICES’ ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@shreecom01) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !  https://t.me/shreecom01


Post a Comment

0 Comments