चंद्रपूर : महाराष्ट्र – तेलंगणा सीमेजवळ भूकंपाचा जोरदार झटका जाणवला.भूकंपाचे धक्के चंद्रपूर पर्यंत जाणवले आहेत. तेलंगाणा जवळ 5.0 तीव्रतेचा झटका जाणवला, असे सांगितले जात आहे. चंद्रपूर शहरात बुधवार ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना हे धक्के जाणवले. भूकंपामुळे घरांच्या खिडक्यांचा आवाज येत होता.
नजीकच्या तेलंगणा राज्यातील मुलुंगमध्ये मोठा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले.तेलंगणामध्ये तसेच चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अनेक लोकांनी धक्के जाणवले असे सांगितले. चंद्रपूर शहर तसेच ग्रामीण भागात देखील अनेकांनी धक्के लागल्याने घराबाहेर पडले.
या धक्क्यामुळे भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. खाणीत कोळसा काढण्यासाठी सुरुंग स्पोट केला असावा असा अनेकांचा समज झाला. मात्र आता हे भूकंपाचे धक्के होते असे सांगण्यात येत आहे. गडचिरोली, चंद्रपुर आणि यवतमाळ जिल्ह्यात धक्के जाणवले.
हा धक्का 5,3 रिश्चर स्केलचा भूकंप होता, असे अभ्यासक सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे.भूकंपाचे धक्के कोरची पासून तर सिरोंचा आणि छत्तीसगडच्या भोपालपटनमपर्यंत जाणवले. केंद्रबिंदू हा तेलंगणा जिल्ह्यातील मूलगु आहे.भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्येही आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
0 Comments