लाडक्या बहिणींना खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली डिसेंबरच्या हप्त्याची तारीख

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल भाष्य केलं आहे. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील असं फडणवीस यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील एकही योजना बंद पडू देणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

लाडकी बहीण योजनेचे या आधीचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आत्तापर्यंत एकही हप्ता महिलाना मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा या योजनेचा हप्ता कधी मिळणार याबद्दल प्रश्न उपस्थित होत होते. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाला पूर्णविराम लागला आहे. अधिवेशन संपल्यावर सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

Post a Comment

0 Comments