जर कायदा भिमानं लिहला नसता????

 


कायदा भिमानं लिहला नसता????

जर कायदा भिमाने लिहला नसता
तु  माणसात कसा  बसला असता

त्या धर्मात तु निच जातीचा
विटाळ व्हायचा त्यांना तु शिवलेल्या मातीचा
आज कसा तु रुबाबान फिरला असता 
 जर कायदा भिमाने लिहला नसता
तु  माणसात कसा बसला असता

तुझ्या मंदिरात यायला होती बंदी
तुला देवाच नाव घ्यायला होती बंदी
अरे तु त्यांच ऊष्टच खात बसला असता
जर कायदा भिमाने लिहला नसता
तु माणसात कसा बसला असता

आज भिमाच खाऊन माजला
ज्या ताटात खालला त्याच ताटात हागला
तुला  मताचा अधीकार कोण दिला असता
जर कायदा भिमाने लिहला नसता
तु  माणसात कसा बसला असता

 आज शोधतो  जाती जातीचे नेते
तुला अधिकार देताने ते कोठे होते
कोण मनुवाद्या सोबत भिमासारखा लढला असता 
जर कायदा भिमाने लिहला नसता
तु माणसात कसा बसला असता

देवदत्त तुझ्या जातीचा टक्केवारी तु पहाय 
अन विचार करुन ऊचल तु पाय
संपले असते तुम्ही आजपर्यंत निळा झेंडा जर नसता
जर कायदा भिमाने लिहला नसता
तु माणसात कसा बसला असता

✍️विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर

👉 जरा ईकडे लक्ष द्या!!!
एखाद्या ब्राम्हणाने एखाद्या देवाची आरती लिहुन मदतीचे आवाहन केले असते तर लाखो रुपये लोकांनी दिलेच असते..
आम्ही चळवळीत लिहतो म्हणून आम्हाला कोणी मदत करत नाहीत असे का ❓❓ !!
माझ्या सारखे अनेक विद्रोही कवि लेखक निर्माण व्हावे अस जर तुम्हाला वाटत असेल तर. ....
आम्हाला पाठबळ द्यावेच लागेल।।
[कवीता चांगली वाटली आवडली तरच] कविने न मागता तुम्ही स्वताहुन प्रोत्साहन निधी दिला पाहिजे.
नाही तर आमच्या सारखे कवि कविता लिहुन व चळवळीच्या नादात  दरिद्रीच्या खाईत सापडुन   मरतील व चळवळीसाठी कोणीही पुढे येणार नाही!!!

लिखान आवडले तरच चळवळीसाठी किमान दहा रु प्रोत्साहन निधी 9146669005 या गुगल पे फोन पे वर पाठवा व कवि लेखकांचे मनोबल वाढवा जय भिम नमो बुद्धाय्!!!!

आपलाच विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर

निडर भिमसैनिका पुढे फॉरवर्ड शेअर करायला घाबरु  नको जय भिम 🙏🙏🙏🙏🙏 पुढे फक्त पाच ग्रुप वर शेअर करा मर्दानो...मि लिहायला भित नाही तुम्ही शेअर करायला भिऊ नका   .....................

Post a Comment

0 Comments