"ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून, दलितांच्या तळहातावर तरलेली आहे"- अखिल भारतीय पहिले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ -उद्घाटनपर भाषणातून..

 



"ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून, दलितांच्या तळहातावर तरलेली आहे"- 

अखिल भारतीय पहिले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ -उद्घाटनपर भाषणातून..

"दगड -दगडाच्या कामी येतो, मी तर माणूस आहे " फकिरा - १९५९ या कादंबरीतून 

परखड विचार प्रगटीकरणाचे धनी,इप्टा (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन)चे अध्यक्ष १९४९ ,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्रणी,कथाकार,श्रेष्ठतम कादंबरीकार,अभिजात कवी,लोकनाट्याचे जनक, थोर समाज सुधारक,साहित्यरत्न लोकशाहीर,थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त १ऑगस्ट रोजी विनम्र अभिवादन ! 


®️🙏®️🙏®️🙏®️🙏®️🙏®️

            तुकाराम भाऊराव साठे हे आण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. एक समाज सुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून ते नावारूपाला आले. आण्णाभाऊ साठे हे मार्क्‍सवादी आंबेडकरवादी विचाराचे  होते.आण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. आण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा, कादंबरी हे साहित्यप्रकार त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यांच्या काही गाजलेल्या कादंबर्या वैजंता ,टिळा लाविते मी रक्ताचा, डोंगरची मैना, माकडीचा माळ ,मुरळी मल्हारी रायाची , चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अशी ही सातार्‍याची तर्‍हा ,अलगुज आणि फकिरा ,चौथी पर्यंत शिक्षण  असुनही, आण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यातील लोकवांग्मय, कथा, लोकनाट्य ,कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या , वग, गवळण, प्रवास वर्णन असे अनेक लेखन प्रकार हाताळले. 

तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय आण्णाभाऊ साठे यांना जाते.सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी या साहित्यप्रकाराचा उपयोग करून घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जनजागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो,गोवामुक्ती संग्राम असो या चळवळींमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून मोठे योगदान दिले

 " माझी मैना गावाकडे राहिली,

 माझ्या जीवाची होतीया काहिली" 

ही त्यांची अत्यंत गाजलेली लावणी होती. 

            आण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियन भाषेतून भाषांतर करून ,पोवाड्यातून रशिया पर्यंत पोहोचवले. रशियन राष्ट्राध्यक्षा कडून त्यांचा सन्मान देखील झाला. आण्णाभाऊंनी आपल्या लेखणीमधून  २१ कथासंग्रह ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या.त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट ही काढले गेले."फकीरा" कादंबरीला स. १९६१ मधे राज्यशासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी या कादंबरीचे कौतुक केले.कोळसेवाला, घरगडी ,खानकामगार, डोअर किपर ,हमाल, रंग कामगार ,मजूर, तमाशातला सोंगाड्या, अशा विविध भूमिका अण्णांनी प्रत्यक जिवनात वठविल्या.आण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर ( मुंबई ) झोपडपट्टीत काढले .

याच झोपडपट्टीत आण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक कलाकृतींची निर्मिती झाली. मुंबईत कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन तसेच मुंबईच्या झोपडपट्टीत उघडेवाघडे जगणे, त्यांच्या जगण्यातील भयान वास्तव त्यांनी पाहिले. त्यांचा भुकेकंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी  होणारी ससेहोलपट,अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि ते विदारक आणि अद्भुत वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरू असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणा ही त्यांनी अनुभवला.स. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली येऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले .

            आण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचे स्मरण करून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमर शेख समवेत त्यांनी काम केले. आण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सुक्ष्म होती.नाट्यमयता त्यांच्या लेखनशैलीचा आगळावेगळा भाग होता. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून आण्णाभाऊनी अनुभूती घेतली त्यातील अनुभव त्यांच्या लेखनातून जाणवला .आण्णाभाऊंचा शेवटचा काळ मात्र अत्यंत हलाखीत गेला. दारिद्र आणि एकाएकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्य प्रतिष्ठाना कडून त्यांची उपेक्षाच झाली .अत्यंत वाईट अवस्थेत गोरेगावच्या सिद्धार्थ नगर मध्ये त्यांचे निधन झाले.

           अनेक विद्यापीठातून आण्णा भाऊंच्या साहित्यावर अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथा, कादंबर्‍या वर केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली. हजारो वाचकांनी त्यांच्या कथा कादंबर्‍याची अक्षरशः पारायणे केली. त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेले सर्व सामान्य माणसाविषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदुःखाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ घालत असे.

           मुंबई नगरी ग बडी बाका l 

         जशी रावणाची दुसरी लंका ll

              वाजतो ग  डंका l

              डंका चहूमूलकी ll 

   या शब्दात पठ्ठे बापूराव मुंबई मायानगरीचे वर्णन करतात. तर याच मुंबई नगरीचे वर्णन करताना आण्णाभाऊ लिहितात-

       "मुंबईत उंचावरी l

      मलबार हिल इंद्रपुरीl

  कुबेराची वस्ती तिथ ,सुख भोगती ll 

  परळात राहणारे l रात दिवस राबणारे

  मिळेल ते खाऊन घाम गाळती ll 

   पठ्ठे बापूरावांना मुंबई गर्भश्रीमंत दिसते, तर आण्णाभाऊंना तीच मुंबई विषय व्यवस्थेचे प्रतीक वाटते. आण्णा भाऊंच्या वेगळ्या जीवनदृष्टीचा येथे प्रत्यय येतो. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे' अशी आण्णाभाऊंची विज्ञाननिष्ठ भूमिका होती.

    ' जग बदल घालुनी घाव l

    अस सांगून गेले मला भीमराव ll

     असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती.आण्णाभाऊ साठे यांचे सारेच

  लेखन उपेक्षितांच्या बाजूचे आणि त्यांच्या अटीतटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभवविश्वाचे प्रखर वास्तव अधोरेखित करणारे होते. 

          १८ जुलै १९६९  रोजी मुंबईच्या चिरागनगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत आण्णाभाऊ साठे त्यांचा मृत्यू झाला.

       🙏अशा या थोर साहित्यिकाला,बिनीच्या शिलेदाराला   स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏

           लेखन 

डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर


®️🙏®️🙏®️🙏®️🙏®️🙏®️


स्वातंत्र्यपूर्व काळातील अस्सल ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवणारे कै.शाहीर अण्णाभाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे)यांचे आज पुण्यस्मरण.

 (जन्म-ऑगस्ट १, इ.स. १९२० –निधन - जुलै १८, इ.स. १९६९)  

त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातिल कासेगाव जवळील वाटेगाव येथे झाला त्यांच्या """" फकीरा व वारणेचा वाघ """"या काद्म्बारीने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले """"विजयन्ता """"-""""माकडीचा माळ """"-""""चिखलातील कमळ """"या कादंबऱ्या पण त्यांनी लिहिल्या 

***त्यांनी २ ५ ० चेवर लावण्या व पोवाडे लिहिले ३ ० ० चे वर कथा लिहिल्या . निवडणूक घोटाळे ,दुष्काळात तेरावा ,अकलेची गोष्ट हि वग नाट्येहि लिहिलि. त्यांनी केलेले पोवाडेही खूप गाजले .***

**अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.

***मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले.*****


****त्यांच्या कादंबऱ्यांचे २ ७ भाषात भाषांतर झाले .

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.

*****ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले

*****संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते अग्रभागी होते .


अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला.

परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.

अश्या प्रतिभा संपन्न साहित्यिकास अभिवादन ""

*Portrait by Chandrakala Kadam*

®️🙏®️🙏®️🙏®️🙏®️🙏®️


®️🙏®️🙏®️🙏®️🙏®️🙏®️

‘माझा असा दावा आहे, की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे’ – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी हे सत्य आपल्या साहित्यातून जिवंत ठेवलं


‘माझी मैना गावावर राहिली’ मला अनेक कारणांनी आवडतं. तिचं वर्णन, ताटातूट, घालमेल, ते अगदी संयुक्त महाराष्ट्रसाठीचा लढा असा पट.

मुंबईच्या मला आवडणाऱ्या वर्णनांपैकी एक ‘माझी मैना गावावर राहिली’ मध्ये अण्णांनीच केलेलं.

आज ५०-६० वर्षांनंतरही ते वर्णन जवळपास तंतोतंत लागू पडतं.    

माझी मैना गावावर राहिली

माझ्या जिवाची होतीया काहिली

ओतीव बांधा, रंग गव्हाळा, कोर चंद्राची, उदात्त गुणांची

मोठया मनाची, सीता ती माझी रामाची

हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती

घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काडी दवण्याची

रेखीव भुवया, कमान जणू इंद्रधनूची, हिरकणी हिऱ्याची

काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची

मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण

नसे सुखाला वाण, तिच्या गुणांची छक्कड मी गायिली,

माझ्या जिवाची होतीया काहिली..

गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची

झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची

वेळ होती ती भल्या पहाटेची

बांधाबांध झाली भाकरतुकडयाची

घालवित निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची

गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची

शिकस्त केली मी तिला हसवण्याची

खैरात केली पत्रांची, वचनांची, दागिन्यानं मढवून काढायची

बोली केली शिंदेशाही तोडयाची, साज कोल्हापुरी, वज्रटीक गळ्यात माळ पुतळ्यांची

कानात गोखरं, पायात मासोळ्या, दंडात इळा आणि नाकात नथ सर्जाची

परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची

आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची

मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात

नाही हसली गालात, हात उंचावुनी उभी राहिली,

माझ्या जिवाची होतीया काहिली.

या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची

मढयावर पडावी मूठभर माती, तशी गत झाली आमची

ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणारांची, मरणारांची, शेंडीची, दाढीची

हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची

बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी, हिरव्या माडीची

पैदास इथं भलतीच चोरांची, ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची,

पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, पर्वा केली नाही उन्हाची थंडीची, पावसाची,

पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची

त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची

बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एकभाषिक राज्याची

 चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बिनीवरची

कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची

उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष

गोळी डमडमची छातीवर साहिली,

माझ्या जिवाची होतीया काहिली..

म्हणे अण्णाभाऊ साठे, घरं बुडाली गर्वाची, मी-तूपणाची,

जुलुमाची जबरीची तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची

चौदा चौकडयाचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची

तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स. का. पाटलाची

अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची

परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाऊन्टनच्या चढाईची

झालं फाऊन्टनला जंग, तिथं बांधुनी चंग

आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली,

माझ्या जिवाची होतीया काहिली.

महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखविली रीत पाठ भिंतीला लावून लढायची

परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गांवाकडं मैना माझी, भेट नाही तिची

तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची

बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची, धोंड खंडणीची

कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची

म्हणून विनवाणी आहे या शिवशक्तीला शाहीराची

आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका

बिनी मारायची अजून राहिली,

माझ्या जिवाची होतीया काहिली

माझी मैना गावावर राहिली

माझ्या जिवाची होतीया काहिली


बाकी अण्णाभाऊंचं साहित्यात योगदान मोठं आहेच. ‘शेटजीचं इलेक्शन’, ‘अकलेची गोष्ट’, ‘बेकायदेशीर’, ‘कलंत्री’, ‘पुढारी मिळाला’, ‘लोकमंत्र्यांचा दौरा’, ‘देशभक्त घोटाळे’, अशी चौदा लोकनाट्यं.

तब्बल बत्तीस कादंबऱ्या ज्यात ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’, ‘वैजयंता’, अशा प्रचंड गाजलेल्या कादंबऱ्यांचा समावेश आणि शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांवरील पोवाडा, रशिया भेटीच्या प्रवास वर्णनासह बावीस कथासंग्रह. एवढंच नाही तर या साहित्याचा जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये अनुवाद.

प्रशांत कदम माझा सहकारी, यशवंतराव चव्हाण, कर्मवीर, मॅक्झीन मावशी, शिरपूर पॅटर्न असे वेगवेगळे विषय त्याने हाताळलेयत.   अण्णाभाऊंवर त्यानं डॉक्युमेंटरी केली. त्यानं सांगितलेला किस्साही अजरामर आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु रशियात गेले तेव्हा त्यांना दोनच भारतीयांबद्दल विचारलं गेलं, एक राजकपूर आणि दुसरे… अण्णाभाऊ साठे

vkoMY;kl ‘ksvj dj.;kl fol: udk vkf.k CykWx yk Qkykso dj.;kl fol: udk-/kU;okn!

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments