सत्यशोधक,साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली ही गीतरुपी पुष्पांजली.

  


साहित्यरत्न बहुमान


लाखमोलाचं साहित्याचं

पेरलय त्यानं धान;

म्हणून साय्रा जगानं दिलाय

साहित्यरत्न बहुमान......./ध्रू/


दीनदुबळ्यांच्या वंचितांच्या

घाली वेदनेवर फुंकर

बेजान अस्तित्वाला तयांच्या

दिली मानवतेची झालर

शब्दाशब्दांतून लिहीलाय त्यानं 

इतिहास तो पानोपान

म्हणून साय्रा जगानं दिलाय

साहित्यरत्न बहुमान......../१/


धगधगणारी चेतवणारी केली

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

लोकनाट्य अन् शाहिरीनं

दिलं लढण्याचं ते बळ

कथा कादंबय्रानं त्याच्या 

डवरलं साहित्याचं रान

म्हणून साय्रा जगानं दिलाय

साहित्यरत्न बहुमान............/२/


कामगार कष्टकरी आता

झालीत पृथ्वीचे मालक

अण्णाच्या लेखणीनं त्यांना 

बनवलं हो नायक

सर्वांगसुंदर मानवतेचं

गायलंय  त्यानं गाणं

म्हणून साय्रा जगानं दिलाय

साहित्यरत्न बहुमान.........../३/


©️✍🏻कवी गीतकार- इंजि.विकी कांबळे

जिजाऊ वाॕटरप्रुफींग अॕन्ड कन्स्ट्रक्शन.

८८५७०९०८८०

vkoMY;kl ‘ksvj dj.;kl fol: udk vkf.k CykWx yk Qkykso dj.;kl fol: udk-/kU;okn!

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments