PM Kisan Scheme सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना
पती-पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे
पीएम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या ९६ लाख ६७ हजार
इतकी आहे. त्यात भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या ९५ लाख ९५ हजार
इतकी असून अजूनही ७८ हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या
नाहीत.
राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक
योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार
आहे. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या २० हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी आता
कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक आहे.
शेतकरी ओळख
क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारीनंतर १९ वा हप्ता
शेतकऱ्यांना देण्यात येणार असून ही अट या हप्त्याला लागू नसेल.
सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
तर ई-केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या ९५ लाख १६ हजार इतकी
आहे. तर अजूनही १ लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही.
बँक खात्याशी आधार संलग्न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ९४ लाख ५५
हजार असून अद्याप १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण केलेली नाही.
तसेच अर्जाला स्वयंमान्यता न दिलेल्यांची संख्या सुमारे ३६ हजार आहे.
त्यामुळेच योजनेच्या १९ हप्त्यांसाठी राज्यातील ९२ लाख ४२ हजार शेतकरी पात्र ठरले
आहेत.
२०१९
पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ
लाभार्थीच्या नावावर २०१९ पूर्वी जमिनीची नोंद असावी. २०१९ नंतरची
जमीन खरेदी, खातेफोड, बक्षीसपत्र असल्यास त्याला
लाभ मिळणार नाही. लाभार्थीच्या नावावर एक फेब्रुवारी २०१९ नंतर वारसा हक्काने जमीन
नोंद झाल्यास लाभ मिळणार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी
यापैकी एकच व्यक्ती आता पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
आयकर
भरणाऱ्यांना बाजूला काढणार
नवीन नियमांनुसार जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. मात्र, ते जर
शासकीय, निमशासकीय, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त
संस्थेचे कर्मचारी असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासह पेन्शनर, नोंदणीकृत
डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट
यांच्यासह सलग आयटी रिटर्न, आयकर भरणाऱ्यांनाही या
योजनेचा लाभ आता मिळणार नाही.
वारंवार
केवायसी का करावी लागते?
शेतकरी पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज
भरतात. त्यांना या योजनेचा लाभही मिळतो. मात्र, काही
हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितले जाते. एकदा
आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचीच ती कागदपत्रे असूनही
वारंवार ई-केवायसी करायला का सांगितली जाते? हा
प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
अर्ज
करताय? पत्नी, मुलांचे
द्या आधार
आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी
आणि मुले यांचे आधारकार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर वारसा हक्क
वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, त्या
शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
१९ वा
हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान योजनेचे आतापर्यंत १८ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. १८
वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात वितरित करण्यात आला होता. आता पुढील महिन्यात म्हणजेच
फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतंर्गत निधी मिळणार
आहे.
0 Comments