फुले चुकीचं बोलले की त्यांचे नालायक अनुयायी चुकीचं वागले? महात्मा फुलेंच्या जीवनातील दोन ह्रदयद्रावक घटना !

 


वरवर वाचू नका. काळजीपूर्वक वाचा आणि विचार कराच.


 फुले चुकीचं बोलले की त्यांचे नालायक अनुयायी चुकीचं वागले? 


महात्मा फुलेंच्या जीवनातील दोन ह्रदयद्रावक घटना !


१-  करोडपती असलेले फुले जेव्हा मरण पावतात तेव्हा त्यांचं पार्थिव स्मशानभूमीत न्हेलं जातं पण चितेला अग्नी कोणीच देत नाही कारण फुलेंना मुलगा नसतो, जो असतो तो दत्तक असतो. त्याचा जन्म कसा  का, कोणत्या स्थितित झाला.. त्यावेळेस त्यावेळेस दत्तक मुलाचे जातीबांधव काय करत होते.. हे सगळ आठवा. तरीही... त्यांच्याच समाजातले कर्मठ लोक, त्यांचे ब्राह्मण नातेवाईक त्या यशवंताला अग्नी देवू देत नाहीत. बराच वेळ हा खेळ चालतो, पार्थिव पडून राहते, तेव्हा साविञीमाई पुढे येवून अग्नी देतात. किती भयानक यशवंताच्या जातीतले जातीवादी लोक असतात.


जीवंतपणी फुलेंच्या जीवनात हाल, अपमान ब्राम्हणांनी केला. पण मेल्यावर सुद्धा त्याच जातीतल्या लोकांनी फुलेंच्या देहाची विटंबना केली. यावर फुले अनुयायी कधी विचार करतील का?


2) फुलेंची सून- शेवटचा वारस जेव्हा मरण पावते तेंव्हा कधी-कधी जेवणासाठी पैसे नसतात तर तिने फुलेवाडा शंभर रूपयांत विकला. पण बहुजनातील कुणीही मदतीला आला नाही. आपल्या शेवटच्या दिवसात फुलेंची पुस्तके विकून गूजराण केली व मरण पावली. तिला दफन करायला कोणी पुढे येईना. मग शेवटी त्या प्रेताला किडे पडले तेव्हा पुणे महानगरपालिकेने ते प्रेत बेवारस म्हणून जाहीर केले व विधी केला.


विचार करा करोडपती असलेले फुलेंचे वारसदार कुञ्याच्या मौतेने मारल्या गेलेत ..... काय गुन्हा होता त्यांचा ??


तुम्हाला शिकून मोठा साहेब बनवावं म्हणून आयुष्याची माती केली आणि आज आम्ही त्यागमुर्ती फुलेंच्या विचाराची माती करत आहोत.


जगाच्या इतिहासात भारतीय दिन दलित, शोषित पिडित, रंजल्या गांजल्याच्या व स्त्रियांच्या आणि समग्र देशात शिक्षणाची सुरुवात करुन बहुजनांसाठी म्हणजेच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महान क्रांती घडवणारे महात्मा जोतीराव फुले.



तुमच्या पिढ्यांच्या उद्धारासाठी ज्ञानाची गंगा तुमच्या उंबरठ्यावर आणुन उभी करणारे महात्मा जोतीराव फुले हे आहेत,

तर मग आम्ही त्यांचा साधा फोटो देखील घरात लावत नसू.....

अजून आपण किती कृतघ्नपणा करणार आहोत.


येणारा काळ आपणाला कधीच माफ करणार नाही.


"सार्वजनिक सत्यधर्म"

हे पुस्तक लिहत असतांना एक हात निकामी झाला तरी ते पुस्तक त्यांनी डाव्याहाताने लिहून बहुजनांची जखम आणि त्यावरील उपाय सुध्दा त्या पुस्तकात नमुद केलाय.


आपण आजपर्यंत ते वेदनापुस्तक एकदातरी वाचले काय ? नाही वाचलं असेल तर तूम्हाला काय म्हणायला हवं, तुम्हीच ठरवा..


एकदा साविञीमाईंनी फुलेंना विचारलं की तुमच्यानंतर या समाजाच कसं होईल ? तर फुले म्हणाले की आपण गेल्यानंतर आपल्या आजच्या या कामाची माहिती आणि जाणीव जेंव्हा बहुजन समाजाला होईल तेंव्हा घरा-घरात सावित्री आणि जोतिराव जन्मतील....


आतापर्यंत किती सावित्रीमाई आणि जोतिराव फुले बहुजन समाजात जन्माला आलेत?


पुढे फुले सांगतात की माझ्या समाधीवर फुले अर्पण करण्यासाठी बहुजनांचा जनसागर येईल. आपण पुण्यात राहता किंवा पुणे फिरायला जातात तर तेंव्हा आपण महात्मा फुले यांचा वाडा स्वतः व आपल्या मुलांना दाखविला काय ? नाही केलं असेल तर , तूम्हाला काय म्हणावं... तुम्हीच ठरवा...



मला एक प्रश्न पडतो की

फुलेंनी बहुजनांवर जो विश्वास ठेवला तो आम्ही सार्थ ठरविला का?


जोतिबा फुले चुकीच बोलले की

त्यांचे अनुयायी चुकीचं वागले ?

विचार करा.


बहुजन बंधू-भगिनींनो

ब्राम्हणवाद्यांनी सरस्वतीला विद्येची देवता का बनवली ?

आपल्या बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या विद्येच्या मातेला - सावित्रीबाईचं कर्तृत्व झाकण्यासाठी.

या डावाला आतातरी आपण बहुजन मिळून असफल करूया.


हे क्रूर ब्राम्हणवादी

देव, देवी आणि जाती-पातीच्या नावाने 

आपल्या महामानवांवर अन्याय करत, 

महामानवांच्या खर्‍या इतिहासालाही 

बदलून टाकत होते आणि बदलत आहेत.


बहुजनहो,

चला महात्मा फुलेंच्या विचारांतून आपण सत्यशोधक समाजाच्या नियमानुसार वागण्याचा आज निर्णय घेवूया.


लेख पुर्ण वाचा.

बुध्दीला पटत असेल तर सर्वाना शेअर करा.


       🙏🏻जागो बहुजन जागो🙏🏻

vkoMY;kl ‘ksvj dj.;kl fol: udk vkf.k CykWx yk Qkykso dj.;kl fol: udk-/kU;okn!

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments