खरच भारत देशाला रामराज्याची गरज आहे ? मग आता कोणाचं राज्य चालू आहे ? # Bharat Deshala Ramrajyachi Garaj Ahe ka??



 ब्राम्हण रामराज्य☠


   खरच भारत देशाला रामराज्याची गरज आहे ?

मग आता कोणाचं राज्य चालू आहे ?


मुघलांचं ?

ब्रिटीशांचं ?


या प्रश्नांची उत्तरं देणं सहज शक्य नाही .

कारण भारतातील जनतेला हे रामराज्य नाही इतकंच कळतं.

आता चालू आहे ते कोणाचं राज्य आहे ?, हे मात्र माहीत नाही . 


या देशानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राजेशाही नाकारली आणि लोकशाही स्वीकारली.


ना मराठ्यांचं ,ना मुस्लीमांचं, ना ब्रिटीश इँग्रजांचं राज्य 

स्वीकारलं....

 स्वीकारलं राज्य तमाम भारतीयांचं .भारतात आता लोकांचं राज्य आलं .

धर्म निरपेक्ष, जातविरहित , असं. मानवतेचं असं सर्वांचं राज्य आलं .पण आलं म्हणताना थोडं दुःख होतं .

कारण या सत्तर वर्षात खरी लोकशाही ,लोकांच राज्य आलंच नाही .


...इथं राज्य चाललं हिंदूंचं . अर्थात रामाचं ...


तरीही आज सर्वत्र असं वातावरण आहे की आता रामराज्य येईल .


...राम राज्य येईल असं बोलणा-यांनो सहज येईल रामराज्य हो..पण याचाच दुसरा अर्थ "लोकराज्य जाईल लोकशाही नष्ट होईल" .


...आणि राम राज्य येईल म्हणजे काय होईल याची कल्पना आहे ? रामाची नेमणूक होईल.अर्थात राजा नेमला जाईल .

आता हा राजा कोण असेल ? मुस्लीम ?बौध्द ?ख्रीश्चन ? मांग ? चांभार ? की मराठा ?

😀😀😳😳


नाही या पैकी एकही नसेल ...कारण लोकशाही मार्गानं सत्ता मिळवून (भ्रष्टाचार करून) सत्तेतले राजे कोण आहेत बघा?...

"रामराज्याचे समर्थक-गांधी,नरेंद्र ,देवेंद्र, शहा , साध्वी , साक्षी महाराज , साधू ,सन्याशी,

जोशी ,कुळकर्णी."🙄


कदम ,पवार ,भोसले , जाधव नाही..🤔


 शिवाजी महाराजांनी परस्त्रीला वाईट हेतूनं हात      लावणा-याचे हात कलम केले होते .आणि त्या बहिणीला साडीचोळी देऊन सन्मानान बाईज्जत स्वगृही धाडले होते .


काय होता रामराज्यात पराक्रम ?

..स्व-पत्नीला सीतेला रावणाकडून सोडवून आणले ,परंतु सीतेची अग्नी परीक्षा घेऊन सुद्धा अविश्वास दाखविला (रामायणात लीहील्या प्रमाणे).

राम जर देव होते तर.. अंतःर्ज्ञानानच त्यानं सितेला पवित्र असल्याचं घोषीत करायला हवे होते ..एका धोब्याच्या वायफळ बडबडीन पुन्हा शंकाधीन होऊन सिता गरोदर असतानाही तीला वनात एकटीला सोडले.(आर्थात-ब्राम्हणाने सांगीतल्या प्रमाणे) तीला श्वापदं खातील आणि आपोआप ब्याद टळेल या हेतूनं.

लक्षमणानं स्री असनार्या शुर्पनखेचे नाक-काण कापून अपमानीत व प्रताडीत करणे..हेच होते ना रामराज्यात..🙄

आजही काही ठीकाणी शुद्र व लेकी-बाळींच्या बाबतीत हेच चालु आहे

अशाप्रकारे स्त्रीजातीचा सन्मान न करणा-या व प्रताडीत करणाऱ्या आजच्या हलक्या कानाच्या रामाचे राज्य हवे का?

राम राज्यात कट्टर जातीयवाद होता .याचं उत्तम उदाहरण म्हणजे शंबूकाचा वध .

"शंबूक एक शूद्र होता .त्यानं तपश्चर्या चालू केली". 

रामाच्या राज्यात क्षूद्रांना तपश्चर्या करण्याचा अधिकार नव्हता ,वेद मंत्र उच्चारण्याचा अधिकार नाकारला होता 


(आसं असताना एका शुद्र वाल्मिकीने रामायण लीहीले हे कसं मान्य व्हावं) 


एका बामणाचा मुलगा मरण पावला .त्या बामणानं रामरायाकडे कैफियत मांडली की क्षूद्र शंबूकानं जप करणं चालू केल्यामुळंच माझा मुलगा मेला .मला न्याय द्या...

रामानं मागचा पुढचा विचार न करता तपश्चर्येत मग्न असलेल्या बेसावध निरपराध शंबूकाचा वध केला.

त्याला कैफीयत मांडायचीही संधी दिली नाही ? यालाच म्हणायचं का राम राज्य..!🤔


आमच्या शिवरायांनी तर शत्रूलाही अभय दिलं.. जेंव्हा शत्रून शरण येवून जीवदान मागितलं !.


 सुग्रीव आणि वाली या दोन भावांमधील वाद न मिटवता एकाच भावाची एक बाजू ऐकून एकाला रामानं मारलं तेही झाडाच्या मागे लपून.


आमच्या शिवरायांनी न्याय निवाडा करून न्यायदान केलं निरपराध्यांना कधीच त्रास दिला नाही .अपराध्याला सोडलं नाही .. मग ते संभाजी राजे असले तरीही ..


..यालाच म्हणतात शिव-राज्य !! 👍🙏


       योगी आदित्यनाथ यांनी दूध-गोमूत्रानं सरकारी निवासाची शुध्दी केली अणि रहायला गेला . का तर म्हणे आधीचे मंत्री शुद्र होते .

बहुजनांनो विचार करा कोणाचं राज्य येत आहे .. खरंय तुमचं बाबांनो रामराज्य येत आहे* 

..पण रामराज्यात आपलं स्थान काय असेल ? याचा विचार नाही केलात .. तर "पुन्हा लंगोटावर फिरायची" वेळ येईल. 😳


हे भविष्य नाही बरका ., तुमच्याचं कर्माचं फळ असेल .

OBC-मराठाही क्षूद्र आहे .हे विसरू नका..आणि..रामराज्याला विटाळ आहे क्षूद्रांचा..!


रामराज्य म्हणजे शिक्षण बंदी ,संचार बंदी ,मूक्त व्यवसाय बंदी ,रोटी-बेटी बंदी..

..फक्त..कर्मकांड, कट्टर जातपात ....

एकंदरीत बहुजनांची बरबादी


बहुजनांनो विचार करा आणि ठरवा .रामराज्य हवं कि शिवराज्य .. 

शिव संकल्पनेतला मराठा म्हणजे सर्व जाती धर्माचा माणूस.. जो समतेनं ,ममतेनं, न्यायानं वागेल-जगेल तो.

आणि आजचे राम राज्य हिंदूंच नव्हे तर बामणांच आहे ..त्यात केवळ बामण - बनियांचं वर्चस्व आहे ,बाकी सगळे क्षूद्र-निच..


विषमता - शोषण हाच रामराज्याचा आहे पाया..!

तो मान्य नव्हता शिवराया..!!


या स्वतंत्र भारतात लोकशाही असताना ,लोकांनी आपले चांगले प्रतिनिधी निवडावे म्हणून प्रत्येकाला मतदानाचा समान हक्क असताना.. लोकशाही स्वीकारल्यापासून खरी लोकशाही राबवणारे चांगले लोक निवडता नाही आले आपल्याला.

मग ते रामराज्यातील राजे चांगले निपजतील ? त्यांना निवडण्याचा अधिकारंच नसेल तुम्हाला..रामराज्य येईल तेंव्हा. 

आजंच जागे व्हा.. लोकहो संविधानानं राजे केलेत तुम्हाला .. हे राजेपण गमावू नका .संविधान वाचवण्यातच आहे या देशाच भलं..

सावध व्हा,मनुवाद्यांनी कधीच कुणाचं भलं नाही केलं..

..गुन्हेगार होते का संत तुकाराम,शिवाजी महाराज ,शंभू राजे,ज्योतिबा फुले ,शाहू महाराज ,बुध्द ,बाबासाहेब आंबेडकर ,संत कबीर.. 

..केलेना अपमानीत,खून यांचे..अजूनही मनसुबे तेच आहेत.

संविधान संपले की रामराज्यच चालेल त्यांचे..गळे दाबले जातील मानवतावाद्यांचे.

 

बहुजनानो व्हा रे सावध..होऊ नका या शिका-यांचे पारध.

हे लढणार नाहीत तुमच्याशी दोन हात करून..पाठीत खंजर खुपसुन टाकतील मारून..

बघा ना थोडा विचार करून..


🙏🌹जय जिजाऊ-जय शिवराय-जय भीमराय🌹🙏


vkoMY;kl ‘ksvj dj.;kl fol: udk vkf.k CykWx yk Qkykso dj.;kl fol: udk--/kU;okn!

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments