पुरोगामी महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास - देवप्पा महार -

 

 रयतेच्या राज्यावर मोठं संकट आलं होतं मोठे धनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मोठ्या हिंमतीने धाकले धनी छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी यशस्वीपणे स्वराज्याची धुरा सांभाळली आणि छत्रपतींचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच फितुरी डोकं वर काढू लागली. आणि छत्रपती संभाजी राजे यांना जावळीच्या वाटेतच औरंगजेबाच्या सैन्याने कैद केले छत्रपती संभाजीराजे यांना बहाद्दूर गडावर ठेवण्यात आले कडा पहारा खूप मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता .

          इकडे रायगडावर राणी येसूबाई हवालदिल झाल्या होत्या राजांना त्यांनी एक पत्र लिहिले आणि राजेंपर्यंत पोहचविण्याची जबाबदरी रायप्पा महार यांचे बंधू देवप्पा महार यांचेवर सोपविली रायप्पा आणि देवप्पा महार बहादूर गडावर पोहचले राजांची रस्त्यावरून छळ करीत धिंड काढली जात असताना राग अनावर होऊन रायप्पा संभाजीराजेंसमोरच गनीमावर तुटून पडले आणि २०-३० गनीम तोडून प्राण सोडले .

             देवप्पा महार यांचे कडे राणी येसूबाई यांनी दिलेला खलिता होता तो राजे संभाजी महाराज यांना पोहचवल्याशिवाय परतणे नाही म्हणून समोर सख्या भावाचे मृतदेह सोडून पुढे दिलेली कामगिरीवर लागला आणि संभाजीराजे महाराज जिथे कैद होते त्या जागी जाऊन राणी येसूबाई यांचा खलिता योग्य हातात सोपवून राजेंना लखोटा मिळाल्याची खात्री करून मगच बहादूर गड उतार होणारा निधड्या छातीच्या महार घराण्याचे रायप्पा आणि त्यांचे बंधू देवप्पा महार यांना तमाम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही .

        छत्रपतींनी बहुजनांचे ,रयतेचे राज्य निर्माण करून त्या स्वराज्याची संरक्षणाची जबाबदारी रयतेच्या प्रत्येकावर सोपविली होती म्हणून राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धाकले महाराज संभाजीराजे गेल्यावर देखील औरंगजेबाच्या अफाट सैन्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही ...!

           महाराष्ट्राचा एकनिष्ठ आणि स्वामिनिष्ठ पराक्रमी सरदार देवप्पा महार यांच्या शौर्याला माझा त्रिवार मानाचा मुजरा...!

      🙏🙏🙏🌹🌹🌹


#शंतनु वानखेडे

  सिव्हिल लाईन्स, अकोला

  दिनांक - १० ऑक्टोबर २०२०

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments