चाळीशी...

प्रेम, सेक्स आणि चाळीशी...

अत्यंत निर्लज्ज नातं असतं हे नवरा-बायकोचं. भांड भांड भांडून पुन्हा थोडय़ा वेळाने एकत्र झोपतात. स्लिपिंग विथ द एनिमी. छी:!’ समोरच्या चाळिशीच्या स्त्रीने ज्या संतापाने हे उद्गार काढले ते ऐकून मी अवाक् झालो. संताप मी समजू शकतो पण एवढा तिरस्कार! एका नवरा-बायकोच्या भांडणात वैतागून नवरा म्हणाला, ‘‘मी मोठी चूक केली की तुला नीट न बघताच लग्नाला हो म्हटलं.’’ त्यावर बायकोही चिडून बोलली, ‘‘माझी िहमत तर बघ, मी तर तुला बघूनही हो म्हटलं! ही तर माझी केवढी मोठी घोडचूक झाली!’’
पती-पत्नी नातं हे मॅनमेड, मानवनिर्मित. त्यात कितीतरी अपेक्षा ठेवून आपल्या समाजात लोक जगत असतात! सर्व अपेक्षा काळाच्या ओघात कधी वाहून जातात हे त्यांना लक्षातही येत नाही. सध्या तर त्यातून आत्मसन्मानाच्या जागृतीचा काळ. व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काचा काळ. म्हणूनच जोडीदाराकडून जेव्हा अपेक्षापूर्ती होत नाही तेव्हा असा संताप होणे स्वाभाविक आहे. पण त्याच्या जोडीला जी तिरस्काराची भावना प्रामुख्याने लक्षात येत होती त्यातून त्या व्यक्तीला लग्नाच्या नात्याचा खरा अर्थ लक्षात आलेला नव्हता हेच खरे.

आपण या जगात जे येतो आणि ज्या पद्धतीने शेवटपर्यंत जगत असतो ते कुठल्या न् कुठल्या तरी नात्याचे लेबल लावूनच. अमुक व्यक्तीचे मूल म्हणून अथवा अमुक व्यक्तीचे नवरा किंवा बायको म्हणून. नाही तर अमुक व्यक्तीचे आई-वडील म्हणून. मानवी संस्कृतीमध्ये या सर्व नात्यांचा उगम होतो तो लग्न या संस्थेतून. त्या लग्न नात्याचा एवढा तिरस्कार खरंच करावा? यात निश्चितच काहीतरी गफलत होतेय हे मला जाणवत होते. म्हणूनच काही वेळा सांगितले जाते की, आशावादी व्यक्ती ती जी कधी ना कधी लग्न होईल या आशेवर जगत असते. तर निराशावादी व्यक्ती म्हणजे लग्न झालेली आशावादी व्यक्ती. हा दोष लग्नसंस्थेचा नसून त्याविषयी पुरेसे ज्ञान नसणाऱ्या त्या निराश झालेल्या स्त्रीचा होता.

माणसं लग्न का करतात, तर अनुभवाचा अभाव! मग ते घटस्फोट का घेतात, तर संयमाचा अभाव!! व ते पुन्हा लग्न का करतात तर स्मरणशक्तीचा अभाव!!! असे जरी म्हटले तरी अनुभव जर सुखकर करता येत असेल तर पुढील गोष्टी टाळता येतातच. लग्न कुठल्याही प्रकारचे असो नियोजित, कुटुंबसंमत विवाह किंवा प्रेमविवाह, त्या विवाहात या नातेपरिपक्वतेतूनच साहचर्य प्रेमाचा, कम्पॅनियनशिप प्रेमाचा उगम होतो. या प्रेमाचे दोन गुणविशेष असतात- शृंगारिकता आणि जिव्हाळा. या दोन्ही गुणविशेषांना निर्माण करून जपल्यास ते पती-पत्नी नाते विशेषत्वाने दृढ होत असते. पण प्रत्यक्षात मात्र शंभर पत्रिका बघून बरोबर जिच्याशी आपले जुळणार नाही अशीच पत्रिका आपण कशी निवडली याचे कालांतराने आपल्याला आश्चर्य वाटत राहते. याचे कारण म्हणजे सतत घडणारा विसंवाद.

पती-पत्नींमधील विसंवादाचे मूळ असते त्या व्यक्तीच्या स्वकेंद्रित विचारप्राधान्यांना. ‘भगवान सब का भला कर, पर शुरुआत मुझसे कर’ ही प्रवृत्ती सतत बाळगल्याने मला सुखकर असेल, मान्य असेल तर ठीक नाहीतर जोडीदाराने त्याच्या मनातील विचार सोडून द्यावेत या स्वार्थी वृत्तीचा जन्म होतो. जोडीदाराकडून होणाऱ्या अपेक्षाभंगामुळे निर्माण होणारी नाराजी जेव्हा तुम्हाला सहनशीलतेकडून असह्य़तेच्या राज्यात घेऊन जाते तेव्हा तुमचा ताळ सुटतो. त्यातून रागाचा जन्म होतो. आता इथेच रिलेशनल मॅच्युरिटीचा वापर करणे जरुरीचे असते. राग हा लटका, खोटाखोटा ठेवण्याची सवय करणे नितांत गरजेचे असते. जेवढय़ास तेवढा. राग हा रुसवा असावा, संताप नव्हे. हे समजून उमजून घेतले तर सवयीने ते जमायलाही लागते. हिस्टेरियासारखे उद्रेक तुम्ही टाळू शकाल. विसंवादाला बोथट करणे हे यामुळे जमू लागेल.

 जोडीदाराविषयीच्या रागाने उद्ध्वस्त होणाऱ्या कामजीवनाला सांभाळणे ही तारेवरची कसरत असते.
स्त्री-पुरुषांची मनोलैंगिकता ही पूर्णपणे नसíगकत:च भिन्न असते. स्त्रीची पुष्कळ स्वप्ने असतात आणि ती ‘सर्व’ स्वप्ने एकाच व्यक्तीकडून पूर्ण व्हावीत अशी तिची ‘भाबडी’ आशा असते, तर पुरुषाचे एकच स्वप्न असते आणि ते प्रत्येक स्त्रीकडून पूर्ण व्हावे अशी त्याची ‘आदर्शवादी’ आशा असते.
चाळिशी हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. तारुण्याची सळसळ कमी होत असते. त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येऊन नीरसता वाटत असते. वयाची चाळिशी ही आयुष्याची सेकंड इनिंग. परंतु हा पती-पत्नी नात्यातील नावीन्य ओसरलेला काळ. अस्मितांचा, इगोंचा संघर्ष होण्याचा काळ. पण जीवन जसे रटाळ करणारा तसेच तो रोमांचकता शोधण्याचाही काळ असतो. ‘जगातील सगळय़ात उत्तम मूल आपलं असतं आणि सगळय़ात उत्तम जोडीदार दुसऱ्याचा असतो’ असे वाटण्याचा हा काळ! त्यातून स्त्री व पुरुष यांची स्त्री-पुरुष संबंधातील मनोलैंगिकता ही पूर्णपणे नसíगकत:च भिन्न असते याची जाणीवच त्या दोघांनाही नसते. ना कोणी शिकवत असते. स्त्रीची पुष्कळ स्वप्ने असतात आणि ती ‘सर्व’ स्वप्ने एकाच व्यक्तीकडून पूर्ण व्हावीत अशी तिची ‘भाबडी’ आशा असते, तर पुरुषाचे एकच स्वप्न असते आणि ते प्रत्येक स्त्रीकडून पूर्ण व्हावे अशी त्याची ‘आदर्शवादी’ आशा असते. दुसऱ्याच्या बागेतील गुलाब सुंदर वाटतो पण त्याचे ‘काटे’ आपल्याला कळलेले नसतात हेही सत्य असते. या अज्ञानातूनच नात्यात गोंधळ सुरू होतो.

दुर्दैवाने वयाच्या कंटाळवाण्या चाळिशीच्या काळापूर्वीच कामजीवनातील चाळिशी येत असल्याने रोमांचकता नात्यात आणण्याचा मार्गच बरेचदा खुंटतो. म्हणून नात्यातील प्रेमाचा ओलावा व सेक्सचा रोमांच चाळिशीनंतरही आणणे व टिकवणे अत्यंत गरजेचे असते. दाम्पत्याच्या कामजीवनावर सेक्सच्या क्रियेतील अडथळे इतर बाबींवरही अवलंबून असतात.

नात्यातील प्रेमाचा ओलावा कमी करणारा दाम्पत्याचा सर्वात जिव्हाळय़ाचा छंद म्हणजे वादविवाद करणे. काळाच्या ओघात या नात्यात संवाद कमी आणि वाद जास्त हे वास्तव जन्माला येत असतं. साध्या साध्या ‘संवादा’चा ओघ शेवटी वादाच्या मदानात पसरून त्याचे पात्र रुंदावून तिची ‘वादावादी’ नदी बनते व अशा अनेक नद्या बनून त्या शेवटी काही वेळा ‘तिरस्कारा’च्या महासागराला जाऊन मिळतात. एकदा नवरा-बायकोच्या संवादात नवऱ्याने उत्सुकतेने बायकोला विचारले, ‘तुला असं कधी वाटलं का गं की, माझं लग्न दुसऱ्या कुणाशी झालं असतं तर बरं झालं असतं!?’ बायकोने सुस्कारा टाकीत म्हटलं, ‘छे रे. मला असं स्वप्नातही वाटलं नाही.’ नवरा खूश होऊन म्हणाला, ‘काय म्हणतेस? खरं??’ बायकोनेही लांब श्वास घेत पुन्हा म्हटलं, ‘हो ना! मी कशाला दुसरीचं वाईट चिंतू!?’ झाला वाद सुरू.

वादविवाद हा विवाहितांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. पण किती टोकापर्यंत तो न्यायचा याचेही भान नवराबायको यांनी ठेवले पाहिजे. वादाने उष्णता बाहेर पडते तर संवादाने प्रकाश. जवळजवळ नव्वद टक्के वाद हे किरकोळ गोष्टीवरून होत असतात. नंतर विचार केला तर आपण फालतू कारणांवरून वाद केला असे त्या दोघांच्याही लक्षात येईल. टोकाला जाणारे वाद होत असतील तर त्याला दोघेही जबाबदार असतात. पण पुन्हा दोघे हे वाद विसरून एकत्र येत असतील तर त्यांच्या नात्यातील लवचिकता त्यांनी टिकवली आहे असे म्हटले पाहिजे. हे त्या दोघांनाही उलट अभिमानास्पद आहे. म्हणून वरील स्त्रीने उच्चारलेल्या वाक्यावरून तिला पती-पत्नी नात्यातील ही लवचिकता न कळल्याचे लक्षात येते. उलट ही लवचिकताच अशा नात्यांना पोषक असते. नात्यातील अशी लवचिकता साहचर्य प्रेमामुळे शक्य होत असते. दाम्पत्यांच्या कामजीवनालाही असे साहचर्य प्रेम खूपच पूरक असते. किंबहुना अत्यावश्यक असते. अपेक्षाभंगाचे फटके व वास्तवाचे चटके बसल्याने लला-मजनूसारखे आकर्षण प्रेम कधीच उडून जात असते. पण टिकून राहात असते ते परिपक्व साहचर्य प्रेम.

 कामजीवनावर याचा सकारात्मक परिणाम होत असतो.
पण लग्न मुळातच सततच्या सहवासाचे नाते. चोवीस तासांच्या एकत्रपणामुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाच्या न आवडणाऱ्या, नकारात्मक पलूंच्या दर्शनाने मन उद्विग्न होत असते. संताप येत असतो. त्यांच्याशी जुळवून घेता घेता कित्येकदा तारेवरची कसरतही करावी लागते. काही वेळा जुळवून घेणे शक्यही होत नाही. हे सर्व जरी मान्य केले तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या राग, संताप, चीड या मूलभूत प्रतिसादात्मक नकारात्मक भावनांना आवर घालून त्यांचा निचरा करणे अत्यावश्यक असतेच. तसे जर करता आले नाही तर त्या भावनांचे रूपांतर द्वेषात होते. जोडीदाराविषयीचा असा द्वेष सतत खदखदत राहिला तर जोडीदाराच्या क्षुल्लक चुकांच्या वेळीसुद्धा त्याचा स्फोट होतो. जोडीदाराच्या किरकोळ वाटणाऱ्या चुकांच्या वेळीसुद्धा हिस्टेरिया का होतो हे लक्षात येईल. हे सर्व टाळता येते. त्यासाठी आवश्यक असते ती परिपक्वता, मॅच्युरिटी. जी कष्टानेच मिळवता येते.
कामजीवनावर खोलवर परिणाम करणाऱ्या राग, द्वेष, चीड, संताप, मत्सर, असूया यांसारख्या नकारात्मक भावनांचे वैशिष्टय़ म्हणजे त्या उपजतच प्रत्येक प्राणिमात्रामध्ये क्षणार्धात निर्माण होत असतात, त्यांची निर्मिती टाळता येत नाही. या सर्व नकारात्मक भावनांना दाबून न टाकता नियंत्रित करायला शिकणे म्हणजेच परिपक्वता. जेव्हा व्यक्ती ही नियंत्रणाची कला स्वत:मध्ये पूर्णत्वाने विकसित करून प्रत्येक प्रसंगी त्याचा वापर करू शकण्याची सहजवृत्ती निर्माण करते, अशा वृत्तीलाच संतवृत्ती म्हणतात. आपण सर्वसामान्य माणसं, आपण काही संत नाही, परंतु काही प्रमाणात तरी प्रत्येक विवाहित स्त्री-पुरुषाने जाणीवपूर्वक कष्टाने व्यावहारिक पातळीवर हा सराव करणे गरजेचे आहे. आणि ते शक्यही असते. नात्यामधल्या अशा आवश्यक असणाऱ्या परिपक्वतेलाच मी म्हणतो रिलेशनल मॅच्युरिटी.

जगातील सगळय़ात जास्त अंतर दोन ध्रुवांमधे नसून जवळ असूनही संवादाचा अभाव असणाऱ्या पती-पत्नींमध्ये असते. म्हणूनच विसंवादाचे महत्त्वाचे कारण म्हणजे पती-पत्नींमध्ये संवादाची क्षमता कमी असणे, नसणे किंवा दोघांच्याही संवादाचे स्तर वेगवेगळे असणे. संवाद म्हणजे आपले विचार आणि भावना जोडीदारापर्यंत पोचवणे. ते योग्य पद्धतीने करणे ही एक कला आहे. आपण एक सांगत असतो जोडीदार वेगळेच ऐकत, समजत असतो. हे सर्वसाधारणपणे घडत असतेच. पण लक्षपूर्वक ऐकणे हे जवळीकीच्या नात्यात घडते. संवाद करणे ही एक कला आहे. आपला मुद्दा जोडीदारावर ठसवणे हा प्रत्येक पती-पत्नीचा स्वभावधर्म आहे. आणि तो मुद्दा समजावून न घेणे ही जोडीदाराची उपजतवृत्ती असते. तुमचा मुद्दा जोडीदाराला पटवायचा असेल तर पहिल्यांदा त्याने तो ऐकला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करा.

दाम्पत्यातील विसंवादाचे कारण आíथकही असू शकते. हे नातं ‘अर्थपूर्ण’ बनणे हे जरी आवश्यक असलं तरी आíथक कामना ही आíथक वास्तवाशी संबंधित असावी. हमसून हमसून रडायचीच वेळ आली तर फूटपाथवर बसून रडण्यापेक्षा मर्सडिीजमधे रडायला बरं वाटत असले तरी पसा हे साधन आहे साध्य नाही हे विसरता कामा नये.
ऑफिसजवळच्या भिकाऱ्याला नेहमी पसे देणाऱ्या तरुणाला एकदा त्या भिकाऱ्याने थांबवून विचारले, ‘काय साहेब, नेहमी पाच रुपये देता. आज दोनच रुपये?’ त्या तरुणानेही चेहरा पाडून त्या भिकाऱ्याला सांगितले, ‘काय करणार बाबा, आता माझं लग्न झालंय!’ ते ऐकून तो भिकारी म्हणाला,‘बस का! म्हणून काय माझ्या पशावर चन करायची?’ यशस्वी नवरा तो जो बायको खर्च करते त्यापेक्षा जास्त कमवू शकतो, आणि यशस्वी बायको ती जी असा नवरा मिळवते. (पण प्रत्यक्षात या मापदंडानुसार सर्वसामान्यांमध्ये बहुतांशी नवरा-बायकोही अपयशी असतात असे म्हणायला काही हरकत नाही.)
जगात तीन प्रकारच्या व्यक्तींचा अनुभव येत असतो. पहिली ती, जिच्याशिवाय आपण राहू शकत नाही, दुसरी ती, जी आपल्याशिवाय राहू इच्छित नाही, आणि तिसरी ती व्यक्ती, जिच्याबरोबर आपण राहात असतो!’ हे वास्तव लक्षात घेऊनच ही गोष्ट समजली पाहिजे की, पती-पत्नी नाते हे केवळ सहअस्तित्व असता कामा नये, ते सहजीवन असले पाहिजे. जीवन म्हणजे चतन्य. त्यांचा एकमेकांचा असणारा सहवास चतन्यमय होतो त्यांच्या आपसातील प्रेमाने, साहचर्य प्रेमाने.

कामजीवनावर परिणाम करणाऱ्या राग, द्वेष, चीड, संताप, मत्सर, असूया यांसारख्या नकारात्मक भावना उपजतच प्रत्येक प्राणिमात्रामध्ये क्षणार्धात निर्माण होत असतात, त्यांची निर्मिती टाळता येत नाही. या सर्व नकारात्मक भावनांना दाबून न टाकता नियंत्रित करायला शिकणे म्हणजेच परिपक्वता.
साहचर्य प्रेम, कम्पॅनियनशिप, लव्ह हे प्रत्येक पती-पत्नींना अभ्यासाने निर्माण करता येते. तेच आयुष्यभर साथ देते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते! ती स्त्री पत्नी असणे हे शक्य असते. पण हे यशस्वी पत्नीच्या बाबतही ‘सपोर्टव्हि’ नवऱ्याकडून घडू शकते हे जाणून घेतले पाहिजे. मागे राहून पुढच्याची किंमत वाढवण्याची क्षमता ‘शून्या’कडून शिकणे. स्वत:ला वेळप्रसंगी थोडेसे ‘अहंशून्य’ केल्याने जमू शकते.
पण यासाठी जरूर असते ती पती-पत्नींमधील मत्रीची. मत्रीचा पाया असतो तो आपलेपणाचा, जिव्हाळय़ाचा. मत्रीमध्ये मन मोकळे करण्याची तीव्र इच्छा असते. कोणीतरी आपलं म्हणणं ऐकावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मत्रीमध्ये ते घडतं. मनातील मळभ दूर होऊन मन स्वच्छ होते. त्यात नवीन ऊर्जा जमायला सुरुवात होते. चतन्य निर्माण होते. मत्रीचे ठिकाण हे चतन्याचे इंधन भरून देणाऱ्या पेट्रो्लपंपाप्रमाणे असते. स्वत:च्या योग्य गुणांचे कौतुक ऐकायची इच्छाही प्रत्येकाला असते. मत्रीमध्ये ते घडते. पती-पत्नींनी एकमेकांसाठी मत्रीच्या या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक अमलात आणल्या तर पती-पत्नी मत्रीचे नाते कुठल्याही प्रकारचा विवाह असला तरी दृढ होऊ शकते.

पती-पत्नी नात्यात मत्री सहजशक्य का होत नाही याचीही कारणे आहेत. अतिपरिचयात् अवज्ञा. चोवीस तासांच्या संबंधांमुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाच्या नावडत्या, नकारात्मक गुणविशेषांनी मन नाराज होत असते. कौटुंबिक त्रासाने मन उदास होत असते. नियोजित लग्नात जोडीदार पूर्वपरिचित नसल्यास मत्री होण्यास संकोच आड येतो तर प्रेमविवाहात जोडीदाराविषयीचा अपेक्षाभंग होत गेल्याने रागात रूपांतर होत राहते. हा राग साचत राहिला तर स्फोटक परिस्थिती निर्माण होते. मग मत्री तर दूर, शत्रुवत् नाते जाणवत राहते. जसे काही ‘स्लिपिंग विथ द एनिमी.’ बाहेर शोध घेणे सुरू होते. दुसरी कोणीतरी व्यक्ती टपलेलीच असते. कालांतराने संसारात त्सुनामी निर्माण होते.

हे सर्व टाळता येते. पती-पत्नींनी प्रथम मत्रीसाठी उद्युक्त व्हायला पाहिजे. नात्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तडजोडवृत्ती आणि संवाद-प्रवृत्ती जागृत करून नात्यात आपलेपणा आणला पाहिजे. स्वत:च्या मुलांविषयी प्रत्येकाला आपलेपणा असतो. मग त्यांचे तुमच्या मनाविरुद्ध वागणे, बोलणे तुम्ही राग आला तरी सहन करता, संताप आला तरी विसरून जाता, त्याचे रूपांतर द्वेषामध्ये करीत नाही. तसेच जोडीदाराविषयी घडले पाहिजे. मग कुठल्याही परिस्थितीत नातं शत्रुत्वाचं वाटणार नाही.
नात्यात जोडीदाराला स्पेस देणे, मोकळीक देणे अत्यंत जरुरीचे असते. कारण जग हे एकच असले तरी प्रत्येकाचे वेगळे असते. अर्थात ही मोकळीक म्हणजे अर्निबधता नव्हे याचीही जाण संबंधित जोडीदाराने ठेवावी. पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या वातावरण-वलयामधे तिच्या गुरुत्वाकर्षणामुळेच जशी एखादी वस्तू मुक्तपणे फिरू शकते, मात्र ते वलय पार करून जर ती वस्तू अवकाशात गेली तर ती भरकटत जाते, अर्निबधपणे. तसेच पती-पत्नी नात्याच्या गुरुत्वाकर्षणाचे, नतिकतेचे वलय (प्रत्येक दाम्पत्याची नतिकता भिन्न असू शकते.) त्या दोघांनीही ठरवायचे असते. ते पार करून जर कोणी ही मोकळीक घेतली तर ती व्यक्तपण अशीच भरकटत जाते.

नात्यातील गुरुत्वाकर्षणाच्या वलयाची सीमा मात्र प्रत्येक नात्यामध्ये वेगवेगळी असू शकते. सापेक्ष असते. नात्यातील गुरुत्वाकर्षण जेवढे बलवान तेवढे वैवाहिक बंध हे जास्त बळकट आणि या वलयाची सीमा जास्त दूरवर जाऊ शकते. म्हणजे अशा पती-पत्नींमध्ये जोडीदाराला मिळणारी मोकळीक, स्पेस ही कितीही असली तरी त्यांच्या नात्यात ओलावा टिकून असतो, दुरावा राहात नाही. प्रत्येक दाम्पत्याने आपापल्या नात्यातील मापदंड स्वत:च ठरवायचे असतात. या गुरुत्वाकर्षणाचा जोर पूर्णपणे दोन गोष्टींवर असतो- जोडीदार आपला ही जाणीव, ‘सेन्स ऑफ ओननेस’, आपण जोडीदाराचे हे भान तसेच ‘सेन्स ऑफ बिलाँगिंगनेस’. नात्यातील हे गुरुत्वाकर्षण हेच साहचर्य प्रेमाचा पाया असतो. कारण यातूनच संवाद-प्रवृत्ती आणि तडजोडवृत्ती विकसित व्हायला मदत होते.

कित्येक विवाहित पुरुष स्वत:चे वर्णन ‘एक था टायगर’ या शब्दात करतात. त्यांच्या दृष्टीने लग्नानंतर त्यांना करावी लागणारी तडजोड याला कारणीभूत ठरते. पण खरे म्हणजे तडजोडवृत्ती दोघांनीही निर्माण करायची असते. ठराविक मुद्दय़ांवर वाद निर्माण होत असतील तर अ‍ॅडजस्टमेंट आणि कॉम्प्रमाइज करणे यावर दोघांनी भर दिला पाहिजे. अ‍ॅडजस्टमेंट म्हणजे दोघांपकी कोणा एकाच्या पसंतीला दुसऱ्याने त्याच्या पसंतीक्रमात ती बाब नंतर येत असली तरी मान्य करणे. तर कॉम्प्रमाइज म्हणजे दोघांनीही पसंतीक्रमात एक एक पायरी खाली उतरत समान बाब शोधून त्यावर भर देणे. अशी मानसिकता ठेवल्यास दाम्पत्यजीवनात साहचर्य निर्माण होऊन त्यांची समाधानी वाटचाल होऊ शकेल.
सर्वात महत्त्वाचे विसंवादी सूर हे लंगिकतेशी संबंधित असतात. ‘काम’ जबाबदारी, पुरुषार्थ झिडकारून जगणे म्हणजे लग्नसंस्थेचा पायाच डळमळीत करणे हे असते. सेक्समध्ये रिटायरमेंट नसते. आणि इतर सर्व व्यवधाने सांभाळूनही ही जबाबदारी पार पडू शकते. इथेच मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता नवविवाहितांपासून चाळिशीच्या पुढील सर्वानाच असते. सेक्स ही केवळ िलग-योनी संबंधितच क्रिया नाही. ते एक नाते आहे. तो एक नितांत उत्तेजक शृंगारिक, रोमॅण्टिक प्रवास आहे. िलग-योनी संबंध हा केवळ त्याचा शेवट असतो.

 आयुष्याच्या अंतापर्यंत लंगिक सक्षमता, सेक्सचा फिटनेस टिकवल्यास त्या व्यक्ती हा प्रवास करू शकतात. काही वेळा त्याचे स्वरूप बदलू शकते. जोडीदाराच्या निकटतेचा किंवा स्पर्शाचा आनंदसुद्धा उत्तेजक वाटतो. कारण सेक्स, काम हा बा संवेदनांचा अंतप्र्रवास असतो. पंचेद्रियांकडून या सुखद संवेदनांचा प्रवास मेंदूतील गाभ्यातील उत्तेजकतेची हायपोथॅलॅमस, मेडियल डॉर्सल थॅलॅमिक न्युक्लिअस ही केंद्रे पार करीत अमृतानंद देणाऱ्या न्युक्लिअस अ‍ॅक्युम्बन्स या केंद्रामध्ये समाप्त होत असतो.
हा कामप्रवास कल्पनाविलास, रोमॅण्टिक फॅण्टसी करीत अंतर्गत अंतर्यात्रा स्वरूपातही करता येतो. सेक्सच्या वेळी डोळे बंद केले की, प्रत्येक स्त्री-पुरुषाची अंतर्यात्रा सुरू होत असते. पण दोघांच्या या अंतर्यात्रेत थोडासा फरक असतो. स्त्रीने तिचे डोळे मिटले की तिच्या डोळय़ांसमोर तिला आवडणाऱ्या व्यक्तीचे चित्र येते तर पुरुषाच्या डोळय़ांसमोर मात्र त्यापुढे ‘फिल्म’ही सुरू होते! जेव्हा अशी कामोत्तेजना घडते तेव्हा मेंदूच्या पुढील प्री-फ्रन्टल भागातून विचार लहरी उत्तेजक केंद्राकडून अमृतानंद केंद्राकडे जाऊन तशीच कामानंदाची अनुभूती देतात.
चाळिशीनंतरचा कामजीवनाचा अनुभव हा दु:खद असतो. अशा वयात येणं स्त्रीला दु:खदायक वाटतं. जेव्हा जोडीदाराला ती ‘नीरस’ वाटू लागते व पुरुषालाही असं वय अपमानास्पद वाटतं जेव्हा जोडीदाराला तो ‘निकामी’ वाटू लागतो. हा काळ लंगिक समस्यांनी भरलेला असतो. िलगाची ताठरता ही िलगातील रक्तपुरवठा कमी कमी होत गेल्याने कमी होऊ लागते. मधुमेह, अथेरोस्क्लेरॉसीस या व्याधींप्रमाणे गुटखा, तंबाखू, स्मोकिंगचे व्यसन (आणि अर्थातच दारूचे व्यसन सर्वसमस्याव्यापीच असते), सेक्स लाइफमध्ये गॅप्स पडत राहणे यामुळे इच्छा असून वाटचाल होत नाही. कारण िलगातील रक्तवाहिन्या अकार्यक्षम बनत राहातात. कामेच्छा कमी होणे हे सुरुवातीचा ‘हनिमून काळ’ संपला की जाणवायला लागते.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘तोच तोचपणा’ किंवा रुटीननेस. नावीन्य ओसरण्याने जेव्हा हे घडते तेव्हा त्याला सेक्सॉलॉजीमध्ये ‘हॅबिच्युएशन फिनॉमेनॉन’ असे म्हणतात. कामसंबंधात वैविध्य, रोमॅण्टिक विचारसरणी इत्यादी गोष्टींनी हे बदलता येते. पती-पत्नींमधील बेदिली, विसंवाद, एकमेकांविषयी तिटकारा इत्यादीमुळे जोडीदाराविषयी कामभावनाच काय पण आपुलकीही राहात नाही. काही वेळा तर टोकाची घृणाभावना तर नातंच डळमळीत करते.
स्त्रीमध्येही योनीमार्गाचा कोरडेपणा व त्यामुळे वेदनामय संभोग या गोष्टी घडतात. मधुमेह व अथेरोस्क्लेरॉसीस ही शारीरिक कारणे याला कारणीभूत होतातच, परंतु जोडीदाराबद्दल मानसिक असंतोष व भावनिक दुरावा यांचाही फार मोठा वाटा असतो. स्त्रीची कामेच्छाही लयाला जाण्याची ही महत्त्वाची कारणे असतात. कुठलेही जेल वा तेल कृपया कोरडेपणासाठी वापरू नये. त्यामुळे योनीदाह होण्याची शक्यता असते. जोडीदारालाही लालसर िलगचट्टय़ांचा त्रास होऊ शकतो. (नुकत्याच एका अशा त्रासदायक केसवर बरेच काळ उपचार करावे लागले.)
मेनोपॉज, मासिक पाळी बंद होणे म्हणजे कामसंबंध बंद करणे नाही. हा तर स्त्रीत्वाचा लंगिक हॉर्मोन नष्ट होण्याचा काळ. केवळ अंडनिर्मिती बंद होते, कामभावना नाही. रोमॅण्टिक स्वभाव टिकवला आणि जोडीदाराविषयी जिव्हाळा फुलवला तर कामसंबंधांतून ‘रिटायरमेंट’ घ्यायची काहीच गरज लागत नाही. सत्तरीची स्त्रीसुद्धा माझ्याकडे तिच्या पंचाहत्तर वर्षांच्या पतीला घेऊन ‘यापुढील’ कामजीवन तरी कसे सुखमय करता येईल यासाठी सल्ला घेऊन गेली. तिच्या दृष्टीने आजपर्यंत तरी सेक्समध्ये त्या दोघांकडून केवळ ‘पाटय़ा’ टाकणे चालले होते. नवऱ्याकडून ‘काम काम आणि काम, कामजीवनात नाही राम’ अशी प्रवृत्ती होती तर तिच्याकडून ‘पत्नीपेक्षा आई जास्त, काही वेळा देवधर्मच रास्त’ अशी मनोधारणा असायची. आता मुले इतरत्र सेटल झाल्यामुळे दोघांनाही निवांतपणा मिळाला होता, त्याचाच फायदा घ्यायला दोघेही उत्सुक होते.

‘अँड्रोपॉज’ हा शब्द जर मेनोपॉजप्रमाणे लंगिक हॉर्मोन नष्ट होण्याचा काळ असे जर मानले तर पुरुषामध्ये कधीच येत नसतो. कारण पुरुषाचा लंगिक हॉर्मोन ‘टेस्टोस्टेरॉन’ हा आयुष्यभर कमी प्रमाणात का होईना पण उत्पन्न होत राहतो. लंगिक सक्षमता, सेक्शुअल फिटनेस जर काही विशिष्ट टेक्निक शिकून टिकवता येत असेल तर कामसंबंधही असा पुरुष ‘व्यवस्थित’ करू शकतो. कृपया ‘औषधपाणी’ असे कामसमस्यांमध्ये नसते हे लक्षात ठेवावे. समस्या या सोडवायच्या असतात, रोगांप्रमाणे बऱ्या होत नसतात. आयुर्वेदिक भस्मे, चूर्णे लंगिक मलमे, स्प्रे यांना दूरच ठेवा. सर्व निरुपयोगी असतात. अ‍ॅलोपॅथिक ‘सिल्डेनाफिल, टाडालाफिल, डॅपॉक्झिटीन’ ही मर्यादित स्वरूपाची औषधे असून साईड इफेक्टनी धोकादायकही ठरू शकतात आणि यातील कशानेच ‘सेक्शुअल फिटनेस’ येत नसतो.

सेक्सचा प्रतिसाद निर्माण होताना वासना केंद्र डोपामाईनने उत्तेजित होते. त्यामुळे ‘ऑक्सीटोसीन’ रसायन मेंदूत व रक्ताभिसरणातून शरीरात इतरत्र पसरते. त्यामुळे मेंदूतील आनंदकेंद्रांवर, विशेषत: ‘न्युक्लिअस अ‍ॅक्युम्बन्स’ या भागावर त्याचा परिणाम होऊन तिथे अत्युच्च आनंदक्षणी रासायनिक िबदूंचा स्फोट होऊन एण्डॉíफन, एन्केफेलीन ही रसायने पसरतात. तत्क्षणी आनंद (प्लेझर), सुखद ग्लानी (ट्रान्स), वेदनारहित स्थिती (अ‍ॅनॅल्जेसिया) व मन:शांती (पीस) अशा जाणिवांनी ‘क्षणिक समाधी’ अवस्था प्राप्त होत असते. ‘संभोग’ हे अशी ‘क्षणिक समाधी’ देऊन मानसिक ताण नष्ट करणारे (स्ट्रेस बस्टर) नसíगक साधन आहे हे शास्त्रीय सत्य लक्षात घेतले पाहिजे. दैनंदिन आयुष्यात जाणवणारे मानसिक ताण घालवण्यासाठी दाम्पत्याने सेक्स हा ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चा उत्तम उपाय आहे हे ध्यानात ठेवून आपल्या कामजीवनाकडे दुर्लक्ष करता कामा नये.

रक्ताभिसरणातून शरीरभर पसरणारे ‘ऑक्सिटोसीन’ जेव्हा हृदयाकडे येते तेव्हा जे विविध परिणाम होतात त्यात एक महत्त्वाचा म्हणजे हृदयाच्या वरील कप्प्यातून ‘अ‍ॅट्रीयल नॅट्रीयुरेटरीक पेप्टाईड’ हे रसायन उत्पन्न होणे. त्यामुळे व ‘ऑक्सिटोसीन’ने ‘नायट्रीक ऑक्साईड’ रसायन निर्माण केल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन त्या रुंदावतात (करोनरी डायलेटेशन), म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा वाढतो. थोडक्यात ‘नसíगक अँजिओप्लास्टी’ होत असते. म्हणजेच प्रत्येक कामोच्च आनंद (ऑरगॅझम) हा हृदय बळकट करणारा ठरत असतो. याचाच अर्थ ऑक्सिटोसीन ही हृदय-संजीवनी असून ‘सेक्स’ ही निसर्गाने दिलेली दीर्घायुष्याची गुरुकिल्लीच आहे.
दाम्पत्याने म्हणूनच ‘चाळिशीनंतर’, ‘साठीनंतरही’ कामजीवनाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अशा दाम्पत्यांनी स्वत:ला ‘रिटायर’ किंवा वृद्ध न समजता या वयातही कामजीवनाकडे लक्ष देऊन ते उपभोगण्याची क्षमता (सेक्शुअल फिटनेस) ठेवली पाहिजे. शिवाय सेक्सचे ‘कपिलग’ व्यवस्थित असले तर त्यांच्यातील नातेही घनिष्ट व्हायला मदत होत असते. कारण मानवात सेक्स ही केवळ क्रिया नसून नातेसंबंध असतो.
हाडांची, अस्थिपेशींची (ऑश्चीओफाईट) व त्वचेच्या कोलॅजेनसारख्या आधार-घटकांची काळाप्रमाणे होणारी झीज काही प्रमाणात तरी ऑक्सिटोसीनने रोखली जात असते. त्यामुळे ऑक्सिटोसीनचा परिणाम हा ‘अँटी-एजिंग’, वयोवृद्धी-घट करणारा असतो. म्हणजेच शरीरात कालपरत्वे निर्माण होऊन शरीराचे वृद्धत्व वाढवणारे रासायनिक घटक, ऑक्सिडंट, आटोक्यात आणण्यासाठी होत असतो. हृदयात गुलाबाच्या बागा फुलवणाऱ्या व समाधानी कामजीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्ती म्हणूनच ‘ऑक्सिटोसीन’मुळे त्या वयोगटातील इतरांपेक्षा जास्त तरुण का दिसतात याचे गमक आता लक्षात येईल.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्स हा सर्वोत्तम शारीरिक व्यायाम आहे. एका सेक्सच्या क्रियेमध्ये पुरुषाच्या साधारणपणे १०० ते १५० कॅलरीज नष्ट होऊ शकतात. (जिममध्ये ट्रेडमीलवर १५-२० मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यावर ७० ते ८० एवढय़ाच कॅलरीज जात असतात.) व्यक्ती किती जोमाने, अ‍ॅक्टिवपणे, तो संबंध करीत असते त्यावर हे प्रमाण अवलंबून राहते. संबंधाच्या वेळी स्त्रीसुद्धा जर किती जोमाने, अ‍ॅक्टिवपणे, सहभाग घेत असेल (विशेषत: स्त्री-वर या पुरुषायित कामासनात) तर तिलाही तो उत्तम शारीरिक व्यायाम घडतो. हा व्यायाम कंबरेच्या स्नायूंना, सेक्सच्या पीसी स्नायूंना एवढेच नाही तर पुरुषाच्या प्रोस्टेट ग्रंथीलाही होत असतो. प्रोस्टेट ही सेक्सची ग्रंथी आहे हे लक्षात ठेवा. प्रोस्टेटची सुदृढता ही नियमित कामजीवनावर असते हे दाम्पत्याने लक्षात ठेवले पाहिजे. स्त्रीमध्ये सेक्सच्या वेळी तिच्या ओव्हरीजवरही परिणाम होत असतो. म्हणून नियमित कामजीवनामुळे ‘सिस्टीक ओव्हरीज’ ही समस्याही आटोक्यात आणता येते. स्त्रीचे पाळीचे त्रासही कमी होत असतात. सेक्स हा पती-पत्नीतील नातेसंबंध असल्याने व्यायाम जेवढा नियमित नातेसंबंध तेवढाच सुदृढ!

घाईगडबडीत, रोमॅण्टिक प्रवास टाळून, शॉर्टकटमध्ये सेक्स करणे हेच पुष्कळ लंगिक समस्यांचे महत्त्वाचे कारण असते. कामकलेला तुच्छ मानण्याची प्रवृत्ती आपल्या समाजात खरे म्हणजे परकीयांच्या आक्रमणातून जन्मली आणि आपला सध्याचा समाज हा हे शेकडो वर्षांपासून पसरलेल्या याच तुच्छतेतून सेक्सकडे पाहात असल्याने आपल्याच ‘कामसूत्र’भूमीत सेक्स संकोचाने आणि ‘टॅबू’ म्हणून बघितले जात आहे.
कामसंबंधाचे ‘त्रिबंध’ (शारीरिक, मानसिक व भावनिक) समजावून देणाऱ्या कामशास्त्राचे विविध ग्रंथ आज म्हणून धूळ खात पडले आहेत आणि देश हा ‘घटस्फोटा’सारख्या वैवाहिक अराजकतेतून जात आहे हे विदीर्ण करणारे वास्तव नाकारता कामा नये. ज्या चुंबनाचे चोवीस प्रकार कामसूत्राने सांगितले आहेत, ते ‘त्रिबंध चुंबन’ वैवाहिक आयुष्यात दिवसेन्दिवस टाळणारे महाभाग दिवसेन्दिवस वाढत आहेत हे विदारक सत्य आहे.

‘सेक्स’ ही निसर्गाने दिलेली दीर्घायुष्याची गुरुकिल्लीच आहे. म्हणूनच दाम्पत्याने ‘चाळिशीनंतर’ तसेच ‘साठीनंतरही’ कामजीवनाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. या वयातील दाम्पत्यांनी स्वत:ला ‘रिटायर’ किंवा वृद्ध न समजता या वयातही कामजीवन उपभोगण्याची क्षमता ठेवली पाहिजे.
अशा दुर्लक्षित कामकलेमुळेच रिलेशनशिपच्याही समस्या बळावतात. वयाप्रमाणे लंगिक सक्षमतेची घसरगुंडी सुरू होते. ‘मनात येतंय पण घडत नाही’ असे सेक्सचे अनुभव यायला लागतात. लंगिक समस्यांचा सुकाळ आणि दाम्पत्यसुखाचा दुष्काळ जाणवू लागतो. पस्तीशी-चाळिशीनंतर हे घडू शकते. या चाळिशीच्या काळात म्हणूनच उपयोगी पडते ती सेक्स फिटनेस थेरपी. प्रत्येकानेच ती शिकणे दाम्पत्यधर्माच्या सुदृढतेसाठी जरुरीचे असते. आपल्याच पूर्वजांनी शोधलेली हठयोग व कामशास्त्रातील कामकलेची काही तंत्रे. ज्यांचा अभ्यास करून मी ‘औषधाविना’ असलेली ही ‘सेक्शुअल फिटनेस’वरील माझी स्वतंत्र आणि एकमेव भारतीय सेक्स थेरपी विकसित केली आहे. याच्या अध्ययनाने कामसंबंध सुमधुर करणे सहज शक्य असते. यासाठी वयाचे बंधन नसते.

लग्न केवळ दोन व्यक्तींच्या एकत्रपणाची क्रिया नाही तर ती त्या संबंधित दोन व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांच्या मिसळण्याची प्रक्रिया आहे. रसायनशास्त्राच्या रासायनिक प्रक्रियांप्रमाणे तिच्यावरही ठराविक वातावरण, तापमान, काळ, संबंधित घटकांचे मूलभूत गुणधर्म इत्यादींचा प्रभाव पडत असतो. कधी कधी तर ती प्रक्रिया व्यवस्थित व्हावी म्हणून एखाद्या कॅटॅलीस्टची, काउन्सेलर स्व?

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments