अव्यक्त प्रेम.. एकदा नक्की वाचा. कथेचा शेवट खरंच खूप भारी आहे.

✨अव्यक्त प्रेम✨

मी 9th क्लास मध्ये असताना मला एका मुला
सोबत चॅटिंग करण्याची सवय लागली. हा मुलगा अनोळखी होता. कुठे राहतो, तो दिसायला कसा आहे. हे सुध्दा मला माहिती नाही. एकदा अचानक एक कागद पडलेला दिसला बहुतेक रोड ने पडला असेल कुणाचा आणि माझं रोड टच घर त्यामुळे तो कागद अंगणात येणं अगदीच साहजिक होत. पण मी तो कागद हातात घेतला. मला सवय होती कुठे ही काहीही दिसलं की वाचायची. म्हणून मी तो ही वाचून बघितला त्यात  कोणाचा तरी नाव आणि नंबर होता. 
मी हे सर्व बघून दुर्लक्ष ही करू शकत होते. पण मी तो कागद फेकून न देता बुक मध्ये ठेवला. आणि कधी मधी उघडून ते बघत असायचे. असे दोन तीन दिवस गेले पण माझ्या मनात उस्तुकता लागली होती. कोणाचा असेल आणि हा मलाच का भेटला. इथे कसा आला. या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळावे, म्हणून एक दिवस मी पप्पाच्या मोबाईल वरून कॉल करून बघितला पण कॉल रिसिव्ह नाही केला  पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री मी एक hiii असा मेसेज केला.
आता तिकडून रिप्लाय आला """hello and who are you""" 
तुम्ही मला नाही ओळखत...
मग तुम्ही ओळखता का मला...
नाही मी पण नाही ओळखत तुम्हाला.. 
मग माझा no. तुमच्याकडे कसा आणि काल पण कॉल आला होता मला बहुतेक तो no. पण हाच आहे...
हो केला होता मी...
का.?
तुमचं नाव अवी का.?
तुम्हाला कसं माहीत...
मला एक कागद भेटला आणि त्यात तुमचं नाव no होता...
कुठे भेटला...
माझ्या घरी...
कुठे राहता तुम्ही तुमचं नाव काय...
इथे मात्र मी विचार केला की हा जो कोणी मी याला ओळखत ही नाही. मग मी माझी खरी ओळख का सांगू. मी त्याला माझी सर्व माहिती खोटी सांगितली. आणि त्याला कारण ही होत. की मोबाईल  पप्पांचा होता. जर याने चुकून कधी कॉल केला. आणि माझं नाव घेतलं तरीही wrong number म्हणुन कॉल कट होईल मला काही प्रोब्लेम नाही होणारं.
आता या पुढे आमचं रोज रात्री सगळे झोपल्यावर 10वाजल्या नंतर चॅटिंग सुरू होऊ लागली. हळू हळू या चॅटिंग चा टाइम वाढत होता. पण तो मुलगा खूप समजदार होता त्याने कधीच स्वतः हून कॉल किंव्हा मॅसेज नाही केला. जेव्हा मी मॅसेज करायचे तेव्हाच तो करायचा. तो नेहमी माझ्या मॅसेज ची वाट बघत असायचा. कधी मधी कॉल वर पण बोलायचो.

तो कविता खूप छान करायचा. मला त्याचा कविता वाचायला खूप आवडायचं. आणि कळत नकळत मलाही वाटू लागलं की मीही कविता कराव्या पण कविता करायला बसलं की काहीच सुचत नव्हत काय लिहावं. त्याला मी त्याच्या कवितेतून ओळखू लागले होते. तो नेहमी आठवण, मैत्री, सुंदरता, किंव्हा वास्तव अश्याच कविता करायचा. मी कधीचं त्याच्याकडून एकही प्रेम कविता नाही ऐकली. 
चार वर्ष आम्ही एकमेकांना सोबत बोलत होतो. पण ना कधी त्याने मला बघितले ना मी त्याला. आणि नाही कधी त्याने माझ्याकडे माझा फोटो मागितला आणि नाही कधी भेटण्याचा हट्ट. पण त्याच्या बोलण्यातून जाणवायचं की तो प्रत्येक स्त्री चा खूप आदर करतो. अजूनही खूप गुण होते त्याच्यात मग कसं कोणी प्रेमात नाही पडणार. त्याच्या सोबत राहून मीही तोडक्या मोडक्या कविता करायला लागले होते. 

पण तो माझ्या नशिबात आहे की नाही हेही माहिती नव्हतं आणि त्याच्या बोलण्यावरून जाणवायचं की तो खूप हळवा आहे. म्हणून उगाच त्याला खोट्या आशेवर ठेवण्या पेक्षा मी माझं हे प्रेम व्यक्त न करताच. एक दिवस त्याच्या पासून दूर झाले. तो स्वतः हुन मॅसेज करत नव्हता म्हणून कधी त्यांचा हि मॅसेज नाही आला. पण तरीही मोबाईलची रिंग वाजली की मी पळत जायचे. कदाचित त्याचा कॉल असेल या आशेवर आणि याच खोट्या आशेवर मी वर्ष काढले. त्या नंतर माझंही लग्न झालं. सुरवातीला हे लग्न मान्य करायला थोड कठीण गेलं मला. कारण तो माझ्या मनात होता...

पाच वर्ष पूर्ण झाले होते आमच्या लग्नाला आणि आमच्या दोघांचा अंश असणारी एक छानशी परिही होती. मस्त चाललं होत आमचं आता कदाचित त्याच्या आठवणीतून मी बाहेर ही आले होते. पण म्हणतात ना की भूतकाळ एकदा समोर येतो तसा एक दिवस माझाही आला. दिवाळीला पसारा आवरताना एका सिम कार्ड चा कव्हर पॅकेट माझ्या हाती लागलं आणि त्यावर त्याचा तो no. होता समजायला जास्त वेळ नाही लागला की हे दोन्ही व्यक्ती एकच आहेत. पण तरीही कधी स्वतःची ओळख मी कधीच सांगितली नाही कारण भीती होती. अचानक अशी दूर झाले होते. कदाचित आता माझ्या बद्घल राग असेल. आणि यामुळे आमच्या या नात्यात कटुता नको. एक पत्नी म्हणून माझं प्रेम मी नेहमी व्यक्त केलं. पण एक प्रीयसीच प्रेम मात्र अव्यक्तच राहिलं....✨योगिता✨

Post a Comment

0 Comments