लॉक डाऊन आणि तिच्या आठवणी

काय ग सोनी किती वेळ लावणार अजून? कधीचा येऊन आपल्या जागेवर थांबलोय मी. मनी ने जरा लटक्या रागातच सोनीवर राग काढला. अरे काळया येतेय ना चालायला वेळ लागतेच ना तुझे आपले नेहमीचे घाई घाई आणि बस घाई जरा धीर सोडवत नाही ना माझ्याशिवाय? कसे होणार रे तुझे माझ्याशिवाय? मागे बघ उभी आहे मी.
सोनीला बघताच नेहमीच वाटणारा कामाचा थकवा कुठे निघून जातो हे मनीला कळत सुद्धा नाही. म्हणुच ते गेले दीड वर्ष रविवार आणि इतर सुट्टीचे वार सोडता रोज भेटतात. अगदी न चुकता न विसरता. आता तुम्ही म्हणाल रोज भेटून असे मिळते तरी काय?
पण हा प्रश्न त्यांना विचारा जे प्रेमात आहेत? अशा लोकांना आपल्या जोडीदारासोबत जेवढ्या भेटी होतात तेवढ्या कमीच वाटतात. दिवसभर काय काय घडले हे समोरच्याला सांगितल्याशिवाय दिवस संपणार तरी कसा? असे सारखे त्यांच्या मनात चालू असते. सोनी समोर येताच मनीने न चुकता नेहमी प्रमाणे तिला आपल्या बाहुपाशात घेतले. इथेच तर संपूर्ण स्वर्ग सामावले आहे. असे तो नेहमी म्हणायचा.
उठा साहेब सूर्य सुद्धा डोक्यावर येऊन ठेपला तरी अजून तुमची स्वारी अंथरुणातच? आईने गोधढीची घडी घालत मनीला म्हटलं. स्वप्नातून पुन्हा एकदा आज तो बाहेर आला. लॉक डाऊन असल्याने सोनीची भेट तर होत नव्हती पण तीने स्वप्नात मात्र पाठलाग सोडला नव्हता.
मनीने चेहऱ्यावर स्माईल करत मोबाईल हातात घेतला आणि नेहमी प्रमाणे पहिलाच मेसेज सरकारचा होता म्हणजेच त्याच्या सोनीचा होता. गुड मॉर्निंग काळया तिचा हा असा रोजचा मेसेज जणू त्याच्या दिवसाची गोड सुरुवात होती. रोज भेटणारे सोनी मनी आज लॉक डाऊन असल्याने जवळजवळ चार महिन्याच्या वर अवधी निघून गेला तरी भेटले नव्हते.
हे दिवस एखाद्या कैदेत असल्यासारखे दोघानाही वाटत होते. मनी तर बऱ्याचदा असेही म्हटला होता की मी गपचूप पोलिसांची नजर चुकवत येतो तुला भेटायला. पण सोनी दिसायला साधी भोली असली तरी एकदा का पारा वर गेला की तिला शांत करने सर्वात अवघड काम. म्हणून तिच्या रागापुढे मनीचे एकही चालत नसे.
ह्या लॉक डाऊनमुळे वाईट परिस्थिती जे प्रेमात आहेत त्यांच्यावर आलीय. कारण माहित आहे का? तर अगोदर वेळ नाही म्हणून एक एकमेकांना टाइम देत नव्हते आणि आता वेळ तर एवढा आहे की तो कुठे कुठे खर्च करायचं हे विचार करायला सुद्धा वेळ घालवतोय. पण तरी सुद्धा भेट होत नाही. कारण घरात आई वडील, भाऊ बहीण आणि इतर कुटुंबातील व्यक्ती सतत इकडे तिकडे वावरत असतात. मग बिचारे बोलणार तरी कसे ना?
इतर प्रेमी प्रमाणे सोनी आणि मनी सुद्धा लॉक डाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. तोच त्यांचा नेहमीचा चहा, गप्पा कमी आणि दंगामस्ती जास्त आणि त्यांचं नेहमीच ठिकाण हेच त्यांना पुन्हा एकदा आयुष्यात हवं आहे. कधी येईल माहित नाही? कसे होईल माहित नाही? होईल की नाही होणार काहीच माहीत नाही. प्रश्न असंख्य आहेत पण उत्तरे सध्या कुणाकडेच नाहीयेत. त्यामुळे सध्या घरीच रहा सुरक्षित रहा. तुमचा जीव वाचवा कारण नंतर कुणाला तरी तुम्हालाही आयुष्यभर जीव लावायचा आहे.
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments