तुमच्या माणसाला समजून तर घ्या, नाहीतर ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते


माझी तमाम स्ट्रग्लिंग कलाकारांच्या आणि फिल्ममेकर्स-रायटर्सच्या आई-वडिलांना त्यांच्या बायकांना आणि नवर्यानां एकच कळकळीची विनंती आहे प्लिज तुमच्या माणसाला समजुन घ्या त्याला हवा तितका सपोर्ट करा आणि शक्य होईल तेवढा मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करा.
मला माहितिये तुमच्यावर त्यावेळेला काय बितत असेल जेव्हा तो सगळं सुरळीत असताना (उच्च शिक्षण/चांगल्या पगाराची नोकरी) तो आपल्या स्वप्नांना आपल्या पॅशनला फॉलो करण्यासाठी अचानक इंडस्ट्री जॉईन करण्याचा टोकाचा निर्णय घेतो,तुमच्यालेखी जरी हे “भिकेचे डोहाळे” असले तरी त्यांच्यालेखी त्यांनी कितीतरी वर्षापासुन उराशी बाळगलेलं स्वप्न असु शकतं.
नसेल मिळत त्यांना लगेच संधी,द्यावे लागत असतिल त्यानां कितीतरी ऑडिशन्स,झिजवावे लागत असतिल त्यानां कितीतरी प्रॉडक्शन हाऊसचे उंबरे,पण ते निदान प्रयत्न तरी करतायेत.काय होईल १० प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या तोंडावर दार आपटलं असेल पण अकरावं दार त्याच्यासाठी उघडं नसेल कशावरुन? १०० ऑडिशन्सनंतर १०१ वं ऑडिशन क्रॅक करुन त्याला उद्या चांगली संधी का नाही मिळु शकत?
मग म्हणुन “चांगली नोकरी केली असतिस तर आज चांगला सेटल झाला असतास तो माझ्या मित्राचा मुलगा बघ आज अमेरिकेत मस्त सेटल झालाय डॉलरमध्ये कमवतोय आणि तु अडिच/तीन हजार पर डे साठी सोळा सतरा तास मरतोयेस.” असं सारखं सारखं टोचुन बोलुन त्याला प्रत्येक वेळेला लुझर ठरवुन नका ना मोकळे होऊ. जर ह्या क्षेत्रात यायचा ढाडसी निर्णय त्याने घेतलाच आहे आणि समजा उद्या नाहीच यश मिळालं एवढे प्रयत्न करुनही तर त्याच्याकडे काहीतरी “प्लॅन बी” असेलच ना? वो झिंदगीमें अपने साथ कुछ ना कुछ तो ढंगका कर ही लेगा.
म्हणुन सांगतोय आपल्या माणसावर विश्वास ठेवा,त्याला ही खात्री पटवुन द्या की “तुम्ही कायम त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी त्यांच्या यशअपयशात सुखदुःखात ठामपणे उभे आहात” मग बघा तो आयुष्यातल्या प्रत्येक लढाईत यशस्वी होऊनच परत येईल. आता तुम्हीच ठरवा त्याच्या स्वागतासाठी दारात आरतीचं ताट घेऊन उभं रहायचं की त्याच दारातुन त्याने उद्या खचुन जाऊन आत्महत्या केल्यानंतर त्याची अरथी घेऊन जायची…!!!
विपुल साळुंखे
‘ksvj dj.;kl fol: udk vkf.k CykWx yk Qkykso dj.;kl fol: udk--/kU;okn!

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments