आम आदमी विमा योजना 2024 महिती मराठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी, क्लेम, फॉर्म

 

जाहिरात मोबाईल मधे बघत असल्यास ब्राउझर चि सेटिन्ग डेस्कटॉपमोड मधे करावी.

  • Maharashtra Aam Aadmi Bima Yojana (AABY) Online Registration Form PDF | एलआईसी आम आदमी विमा योजना 2024 मराठी | एलआईसी आम आदमी विमा योजना ऑनलाइन अर्ज क्लेम फॉर्म PDF, लाभ | Maharashtra Sarkari Yojana | आम आदमी विमा योजना 2024 | Sarkari Yojana 

    भारत देश एक विकासशील देश त्यामुळे आपल्याकडील बहुतांश लोकासंख्या ग्रामीण भागात राहतात त्याच प्रमाणे विविध स्तरावरील ग्रामीण भागातील लोकसंख्या आर्थिक दुर्बल वर्गात मोडतात यांमध्ये अल्पभूधारक शेतकरी व शेत मजूर आणि विविध स्तरांवरील असंघटित कामगार येतात, राज्यात अशाप्रकारचे आर्थिक दुर्बल घटक मोठया प्रमाणात आहेत ज्यात भूमिहीन शेत मजूर आणि विविध व्यवसायांमधी कामगार आहेत, या विविध स्तरांवरील कामगारांना अनेक प्रकारच्या नेहमी समस्यांना समोर जावे लागते, ज्यामध्ये जोखिमीच्या परिस्थिती मध्ये काम करावे लागणे, कामाच्या क्षेत्रात राहण्याची व्यवस्था नसणे, आरोग्य विषयक सेवा नसणे त्याचप्रमाणे दैनदिन जीवनाला लागणाऱ्या मुलभूत सुविधा त्यांच्या कडे नसतात. 

    त्यामुळे अशा असंघटित कामगारांची प्रमुख असुरक्षा म्हणजे आजारपण, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला नेहमी आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, असे बहुतांश कामगार सामाजिक सुरक्षा कवच नसलेले आहेत अशा असंघटित कामगार नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी तसेच त्यांचे सामाजिक जीवन सुधारण्यासाठी, उंचावण्यासाठी सरकारने आम आदमी विमा योजना राबविली आहे, आम आदमी विमा योजाना सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) व्दारे प्रशासित केली जाते, वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण या आम आदमी योजने सबंधित संपूर्ण माहिती जसे पात्रता, योजनेचे लाभ, नोंदणी करण्याची प्रक्रिया, अर्ज सादर करणे, पाहणार आहोत.

    एल.आय.सी आम आदमी विमा योजना 2023 संपूर्ण माहिती 

    सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमी विविध प्रकारच्या सामजिक सुरक्षा आणि आरोग्य विषयक त्याचप्रमाणे लोकपयोगी योजना राबविल्या आहेत, आम आदमी विमा योजना अशीच एक योजना आहे जी नागरिकांना गरजेच्या वेळी त्यांना आर्थिक मदत देऊन सामाजिक सुरक्षा प्रदान करते, या असंघटीत कामगारांचा, ग्रामीण मजुरांचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेत मोठा वाटा असतो, आम आदमी विमा योजना हि केंद्र पुरस्कृत योजना आहे जी 2 ऑक्टोबर 2007 रोजी अंमलात आणली गेली, हि एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी [एल.आय.सी.] द्वारे चालविली जाते आणि जी राज्यातील आर्थिक दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी राबविली जाते ज्यामध्ये ग्रामीण भागातील भूमिहीन नागरिक, शेत मजूर, सिमांत शेतकरी, असे शेतकरी ज्यांच्या कडे पाच एकर पेक्षा कमी जिरायती शेती आणि अडीच एकर पेक्षा कमी बागायती शेती आहे.


    अशा शेतकऱ्यांना शासनाची निर्णयाप्रमाणे भूमिहीन गृहीत धरून या योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच असे नागरिक मोची, आटो चालक, मच्छिमार आणि छोटे व्यावसायिक जे आकस्मिक गंभीर आरोग्य विषयक कारणांसाठी आर्थीक बचत करू शकत नाही, अशा कुटुंबाना आम आदमी योजनेच्या (AABY) अंतर्गत अशा दुर्दैवी परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर्थिक मदत दिल्या जाते तसेच त्याच्या मुलांना सुद्धा या योजनेंतर्गत आयुर्विमा महामंडळाकडून शिष्यवृत्ती दिल्याजाते.

    आम आदमी विमा योजना 2023 विशेषता [Features]

    शासनातर्फे ग्रामिण भागामधील जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, या योजनांच्या अंतर्गत ग्रामिण भागामधील जनतेचे जीवनमान उंचावणे त्यामध्ये सुधारणा करणे त्याचबरोबर त्यांना सामाजिक सुरक्षा देणे असे धोरण असते, या धोरणाच्या अंतर्गत शासनाने आम आदमी योजना हि ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकरी, मजूर अशा परिवारातील मुख्य कमवत्या कुटुंब प्रमुखाला अपघाती किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू किंवा दुर्दैवाने अपंगत्व आल्यास विम्याचे संरक्षण देण्यासाठी आणि तसेच त्याच्या शिकणाऱ्या मुलांसाठी LIC कडून दरमहा शिष्यवृत्ती देण्यासाठी हि सामाजिक सुरक्षा योजना सुरु केली आहे, या योजनेमध्ये 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन परिवारातील कमावत्या कुटुंब प्रमुख किंवा परिवारातील कमावती प्रमुख व्यक्ती यांचा या योजनेमध्ये एल.आय.सी. कडून विमा केल्या जातो, या योजनेंतर्गत विमाच्या हप्त्याची रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी 100 रुपये या प्रमाणे 200 रुपये प्रती लाभार्थी वार्षिक एल.आय.सी. मध्ये जमा केली जाते. या योजनेमध्ये लाभार्थ्याना कुठलीही रक्कम भरावी लागत नाही,

    एल.आय.सी आम आदमी योजना महाराष्ट्र 2023 या योजनेच्या अंतर्गत विम्याच्या अंतिम मुदती पूर्वी विमाधारक कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास एल.आय.सी. कडून त्याच्या नामनिर्देशित वारसांना विम्याची रक्कम 30.000/- रुपये दिली जाते, त्याचप्रमाणे विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास 75,000/- रुपये विम्याची रक्कम किंवा विमाधारकास अपघातामुळे कायमचे अपंगत्व झाल्यास किंवा अपघातामध्ये दोन्ही  डोळे आणि दोन्ही पाय निकामी झाल्यास 75,000/- रुपये विम्याची रक्कम दिली जाते तसेच अपघातामुळे एक पाय आणि एक डोळा निकामी झाल्यास 37,500/- रुपये विम्याची रक्कम भरपाई म्हणून विमाधारकास दिली जाते.


    आम आदमी विमा योजना या योजनेच्या अंतर्गत आणखी विमाधारकाच्या नवव्या ते बाराव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अपत्यांना एल.आय.सी, तर्फे प्रती मुलास 100 रुपये असे प्रती तिमाही 300/- रुपये शिष्यवृत्ती दिलीजाते, 

    आम आदमी विमा योजनेच्या अंर्तगत विमाधारक कुटुंब प्रमुखाला किंवा त्याच्या नामनिर्देशित वारसांना विविध प्रकारच्या परिस्थिती मध्ये किती विम्याचे संरक्षण मिळेल हे खालीलप्रमाणे आहे

    कवरआर्थिक सुरक्षा
    नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास30,000/- रुपये
    अपघाती मृत्यू आल्यास75,000/- रुपये
    अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास75,000/- रुपये
    अपघातामध्ये आंशिक अपंगत्व झाल्यास37,500/- रुपेय
    मृत व्यक्तीच्या दोन अपत्यांना, 9 ते 12वी मध्ये असलेल्या मुलांना शिष्यवृत्ती प्रतिमाह100/- रुपये
    Aam Aadmi Vima Yojana Objectives [ उद्देश्य ]

    भारत सरकारच्या योजना आणी या योजनांचा उद्देश देशामधली आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब नागरिकांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे त्यांच्या जीवनात समृद्धी आणणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देणे असे ग्रामिण भागामधील गरीब नागरिकांसाठी त्यांचे हित विचारात घेऊन शासनाची निर्णयानुसार आयुर्विमा महामंडळाने हि आम आदमी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे, हि योजना भारत सरकारच्या वित्त मंत्रालया मार्फत राबविली जाते. बहुसंख्य कामगार अजूनही समाजिक सुरक्षा कवच नसलेले आहे अशा कामगारांना त्यांच्या कुटुंबाना आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा देणे हा शासनचा उद्देश आहे,

    आम आदमी विमा योजनेंतर्गत भूमिहीन मजूर, पाच एकर पेक्षा कमी जिरायती व अडीच एकर पेक्षा कमी बागायती शेत जमीन असणारे नागरिक भूमिहीन समजले जात, या योजनेचा उद्देश असा आहे कि जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत हि योजना पोहचून त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा. या योजने अंतर्गत विमाधारकाच्या पात्र दोन मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते जेणेकरून मुलांना त्यांचे शीक्षण अबाधित पूर्ण यावे असा शासनचा उद्देश आहे याचबरोबर केंद्र पुरस्कृत आम आदमी विमा योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने भूमिहीन कुटुंब निश्चित करण्यासाठी सुलभ पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहे. 

    या योजनेचे आणखी वैशिष्ट म्हणजे हि या योजनेचा प्रिमियम खूप कमी असल्यामुळे विमाधारकाला परवडण्यासारखा आहे आणि प्रिमियम भरण्यासाठी पैशाची व्यवस्था करण्याचा विचार करावा लागत नाही शिवाय प्रिमियमची अर्धी रक्कम सरकार भरते, याच बरोबर हि योजना वेब प्रणालीवर आधारित असल्यामुळे सर्व सदस्यांचा देता डीजीटल केल्या जातो यामुळे क्लेम सेटलमेंट मध्ये याचा उपयोग होतो आणि आवश्यकते नुसार माहितीची देवाणघेवाण त्वरित होण्यास मदत होते.        

    AABY 2022 highlights 

    योजनेचे नाव आम आदमी विमा योजना (AABY)
    व्दारा सुरुकेंद्र पुरुस्कृत योजना
    अंमलबजावणीमहाराष्ट्र शासन
    योजनेची सुरुवात2 ऑक्टोबर 2007
    लाभार्थीहि योजना एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी समाजातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी आहे
    उद्देश्यअपंगत्व किंवा आकस्मिक मृत्यू या सारख्या दुर्दैवी परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर्थिक मदत
    अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र sjsa.maharashtra.gov.in/
    विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
    ऑफलाईन अर्ज करणेग्रामीण भागामधील नागरिक तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊन नोंदणी करू शकतात
    श्रेणीविमा योजना

    आम आदमी विमा योजना प्रिमियम

    आम आदमी विमा योजना अतर्गत सुरवातीला 30,000/- रुपयाच्या विमा कव्हरसाठी प्रती सदस्य 200/- रुपये प्रतीवर्ष राहील, यापैकी 50 टक्के सामाजिक सुरक्षा निधीतून अनुदानित केले जाईल. ग्रामीण भूमिहीन कुटुंबाच्या बाबतीत उर्वरित 50 टक्के प्रीमियमची रक्कम राज्य सरकार, केंद्र शासितप्रदेश आणि इतर व्यवसायिक गटांच्या बाबतीत उर्वरित 50 टक्के प्रीमियमची रक्कम नोडल एजन्सी आणि किंवा सदस्य आणि किंवा राज्य सरकारव्दारे वहन केला जाईल.


    LIC आम आदमी विमा योजना अंतर्गत लाभार्थी आणि व्यवसाय

    वीटभट्टी कामगारबिडी कामगारसुतार
    मोचीमच्छिमारहस्तकला कारागीर
    हातमाग विणकरहातमाग आणि खादि विणकरलेडी टेलर्स
    लेदर आणि टॅनरि कामगारपापड कामगारशारीरिकदृष्ट्या अपंग स्वयंरोजगार व्यक्ती
    रिक्षाचालक ऑटोरिक्षा चालकप्राथमिक दुध उत्पादकमीठ उत्पादक
    तेंदूपत्ता संग्राहकशहरी गरिबांसाठी योजनावन कर्मचारी
    रेशीम कामगारयंत्रमाग कामगारडोंगराळ भागातील महिला
    कापड कामगारलाकूड कामगारकागद कामगार
    छपाई कामगाररबर आणि कोळसा कामगारमेणबत्ती उत्पादक कामगार
    मातीची खेळणी करणारे कामगारशेतकरीवाहतूक चालक संघटना
    वाहतूक कर्मचारीग्रामीण गरीबबांधकाम कामगार
    फटाक्यांचे कामगारनारळ प्रोसेसरआंगणवाडी शिक्षिका
    कोतवालवृक्षारोपण कामगारस्वयं सहायता गटांशी सबंधीत महिला
    मेंढी पाळणारेपरदेशीय भारतीय कामगारग्रामीण भूमिहीन कुटुंबे
    असंघटीत कामगारहमाल

    आम आदमी विमा योजना लाभ (Benefits)

    • आम आदमी विमा योजना 2023 या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील शेत मजूर, भूमिहीन ग्रामीण तसेच ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिक आणि असंघटीत कामगार या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या सरकार कार्यरत आहे.
    • AABY 2023 च्या अंतर्गत विमा योजनेत प्रवेशाचे वय 18 ते 59 निर्धारित करण्यात आले आहे, विमाधारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित वारसांना 30,000/- रुपये विमा लाभ एल.आय.सी. कडून देण्यात येईल.
    • या योजनेच्या अंतर्गत विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास तर त्याच्या नामनिर्देशित वारसांना 75,000/- रुपये विमा लाभ मिळेल
    अपघात हा अनपेक्षित असतो कुटुंबातील मुख्य कमावत्या कुटुंब प्रमुखाला जर अपघात झाला तर या घटनेचा संपूर्ण कुटुंबाला हादरा बसतो अशा गंभीर परिस्थिती मध्ये आम आदमी योजना कुटुंबाला मदतीचा हाथ देते, या योजने अंतर्गत विमाधारकाला अपघाता मध्ये कायमचे अपंगत्व आल्यास 75,000/- रुपये विमाधारकास एल.आय.सी. तर्फे विमा लाभ मिळेल तसेच विमाधारकास आंशिक अपंगत्व झाल्यास 37,500/- रुपये विमाधारकास एल.आय.सी. कडून विमा लाभ मिळेल.
    • आम आदमी विमा योजना सामान्य गरीब नागरिकांना मृत्यू पश्चात विमा कव्हर प्रदान करते त्याचबरोबर विमाधारकास आंशिक किंवा पूर्ण अपंगत्वा मध्ये विमा कव्हर प्रदान करते आणि त्याच्या कुटुंबातील दोन मुलांना त्यांचे शिक्षण अबाधित पूर्ण व्हावे म्हणून शिष्यवृत्ती कव्हर प्रदान करते.
    • या योजनेच्या अंतर्गत विधारकाच्या दोन मुलांना 100 रुपये प्रती विद्यार्थी दरमहा या प्रमाणे शिष्यवृत्ती एल.आय.सी. च्या माध्यमातून दिली जाते, हि शिष्यवृत्ती तिमाही आधारावर दिली जाते.

    एल.आय.सी आम आदमी विमा योजना 2023 पात्रता

    आम आदमी विमा योजना भारतातील प्रत्येक नागरीकांसाठी नाही या योजनेचे काही पात्रता निकष आहे जे पूर्ण करणे आवशयक आहे, या योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे राहील

    • लाभार्थी पात्र अर्जदार कुटुंबाचा एकटा कमावता प्रमुख व्यक्ती असायला पाहिजे
    • आम आदमी विमा योजनेच्या अंर्तगत ग्रामीण भागामधील भूमिहीन कुटुंबाना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येईल.
    • या योजनेच्या अंतर्गत पात्र अर्जदार भारताचा कायमचा निवासी असायला पाहिजे
    • या योजनेंतर्गत अर्जदाराचे वय 18 ते 59 असणे आवश्यक आहे
    • या योजनेंतर्गत अर्जदार गरिबी रेषेखालील कुटुंबातील (बीपीएल) असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे या योजनेमध्ये निर्धारित केलेल्या व्यावसाईक गटांचा भाग असलेले दारिद्र्य रेषेच्या थोडे वरील कुटुंब 

    आम आदमी योजनेमध्ये समाविष्ट नाही

    हि विमा योजना गरजू आर्थिक दुर्बल नागरिकांसाठी दुर्दैवाने आलेले अपंगत्व किंवा मृत्यू अशा गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून सरकारने हि योजना राबविली आहे, परंतु या योजनेमध्ये काही कारणांना वगळण्यात आलेले आहेत ज्यामध्ये विम्याचा लाभ मिळणार नाही.

    • मानसिक विकारांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व
    • आत्महत्या
    • हॉस्पिटलायझेशनचा खर्च
    • देशामध्ये युद्धसदृश परिस्थिती कारणांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व
    • साहसी आणि धोकादायक खेळांमध्ये भाग घेणे
    • मादक पदार्थांच्या वापरामुळे मृत्यू किंवा अपंगत्व
    • अपराधिक आणि बेकायदेशीर कामांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व 

    एल.आय.सी. आम आदमी विमा योजना 2023 क्लेम करण्याची प्रक्रिया (दावा प्रक्रिया)

    आम आदमी विमा योजनेमध्ये दावा प्रक्रिया शासनाने सुलभ ठेवली आहे, या योजनेमध्ये खालील परिस्थिती मध्ये विमाधारक विमा लाभासाठी दावा करू शकतात, दावा करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे

    • आम आदमी विमा योजने मध्ये म्रृत्यू किंवा अपंगत्वाचे दावे एल.आय.सी. च्या P&GS युनिटव्दारे NEFT व्दारे लाभार्थ्यांना थेट पेमेंट करून किंवा जिथे NEFT ची सुविधा उपलब्ध नाही अशा प्रकरणांमध्ये सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून दावा निकाली काढण्यात येईल.
    • योजनेच्या कालावधीत, विमा मुदतीच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या/ तिच्या नामनिर्देशित व्यक्तीला विम्याची रक्कम मिळविण्यासाठी नोडल एजन्सीच्या नियुक्त अधिकाऱ्याकडे मृत्यू प्रमाणपत्रासह अर्ज करावा लागेल.
    • या नंतर नोडल एजन्सीचा अधिकारी दाव्याच्या कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी करून मृत्यू प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्रासह सादर करेल कि मृत व्यक्ती हा योजनेमध्ये निर्धारित केल्याप्रमाणे बीपीएल किंवा किरकोळ वरील परिवारातील किंवा निर्धारित व्यवसायांतर्गत परिवारातील एकटा कमावणारा प्रमुख सदस्य होता
    • या योजनेंतर्गत नोडल एजन्सीने खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, दावा अर्ज संपूर्णपणे अचूक आणि योग्यरीतीने भरलेला असावा आणि त्याबरोबर मूळ मृत्यूप्रमाणपत्र  आणि एक प्रमाणित प्रत. त्याबरोबर आणखी काही महत्वाचे कागद पत्र सादर करावे लागतील, मृत्यू झालेल्या सदस्याचा पोस्ट मॅर्टेम अहवाल आणि एफआईआर व पोलीस अहवाल.

    योजनेंतर्गत अपंगत्व दावा प्रक्रिया

    • या योजनेंतर्गत विमाधारकाने विमा लाभाचा दावा करण्यासाठी अपघाताचा कागदोपत्री पुरावा तसेच सरकारी सिव्हील सर्जन किंवा पात्र सरकारी और्थोपेडीशियनचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
    • योजनेंतर्गत विमाधारक सदस्याचे अपघातामध्ये अवयव गमावल्याचे तसेच अपघातामुळे कायमस्वरूपी किंवा आंशिक अपंगत्व प्रमाणित करणारे प्रमाणपत्र सादर करणे आवशयक आहे.

    या योजनेंतर्गत योजनेचा सदस्य होण्यासाठी अर्ज करतेवेळी अर्जामध्ये नॉमिनी म्हणून नियुक्ती करावी आणि नामनिर्देशित व्यक्तीची संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे, हा विमा सदस्यत्वाच्या अर्जाचा महत्वपूर्ण भाग आहे व हि प्रक्रिया काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे, जेणेकरून विमाधारकाचा मृत्यू झाल्यास तर मृत्यूनंतर विमा दाव्याची रक्कम प्राप्त करताना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच नामनिर्देशन अर्ज नोडल एजन्सी कडे राहील आणि मृत विमाधारकाच्या दावा अर्जाच्या कागदपत्रांसह एल.आय.सी. मध्ये जमा केल्या

    आम आदमी विमा योजनेंतर्गत विमाधारकाच्या अपत्यांना शिष्यवृत्ती दिली जाते जेणेकरून त्यांना आपले शिक्षण अबाधित पूर्ण करता येईल, शिष्यवृत्तीची रक्कम 100/- रुपये प्रती महिना असेल, आणि हि शिष्यवृत्ती सहा महिन्याच्या अंतराने दिली जाईल व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांना दर सहा महिन्यांनी दावा करावा लागतो या दावा करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

    • ज्या विमा धारकाचे मुले शिष्यवृत्ती साठी पात्र आहेत, त्यांनी दर सहा महिन्यांनी अर्ज भरून नोडल एजन्सीला सादर करावा, आणि नोडल एजन्सी नंतर त्या विद्यार्थ्यांची ओळख पटवेल
    • यानंतर नोडल एजन्सी विद्यार्थ्यांच्या अर्जाची संपूर्ण पडताळणी करून नंतर पडताळणी झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची यादी एल.आय.सी च्या P&GS युनिटला पाठविली जाईल, या यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या सबंधित संपूर्ण माहिती दिली असेल या प्रमाणे
    • विद्यार्थ्याचे नाव
    • शाळेचे नाव
    • वर्ग सदस्याचे नाव
    • विमाधारकाचा पॉलिसी क्रमांक
    • सदस्यत्व क्रमांक
    • बँक खाते तपशील
    • लाभार्थी विद्यार्थ्यांच्या अर्जाची संपूर्णरीत्या पडताळणी केल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट NEFT व्दारे जमा केल्या जाईल, एल.आय.सी. तर्फे शिष्यवृत्तीची रक्कम प्रत्येक वर्षी दर सहा महिन्याला 1 जुलै आणि 1 जानेवारी दिली जाईल.
    • आम आदमी विमा योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्यासाठी वडिलांचा एल.आय.सी. आय डी आवश्यक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे एल.आय.सी. आय डी नाही त्यासाठी मुख्याध्यापक, तहसीलदार किंवा तलाठी यांनी तो प्राप्त करून घ्यावा यामुळे विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती त्वरित प्राप्त होण्यास मदत होईल.
    • पात्र विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे सुरु असेल परंतु हि शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया भविष्यात दुसरी कोणतीही लागू करण्यात येऊ शकते.

    महाराष्ट्र आम आदमी विमा योजना अंमलबजावणी प्रक्रिया

    महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी योजनेसाठी मंत्रालय स्तरावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नोडल एजन्सी राहील, तसेच जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर तहसीलदार या योजनेची अंमलबजावणी करतील. यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इंदिरा गांधी निराधार महिला अनुदान योजनेच्च्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

    आम आदमी विमा योजना अंतर्गत लाभार्थ्यांचा शोध ग्रामीण भागांमध्ये तलाठ्यांनी घ्यायचा आहे त्यासाठी फलक लावणे, गावांमध्ये दवंडी देणे या मार्गांचा अवलंब करण्यात येईल, या मध्ये लाभार्थी भूमिहीन असल्याचे तसेच लाभार्थ्याच्या वयाचा दाखला व जन्म प्रमाणपत्र आणि शैक्षणिक दाखला, रेशन कार्ड, तलाठ्यांनी या सर्व प्रमाणपत्रांच्या आधारावर लाभार्थ्यांची संपूर्ण पडताळणी करावी आणि हि सर्व प्रमाणपत्र नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आधार मानावे.

    नोडल एजन्सी म्हणजे काय ?

    नोडल एजन्सी म्हणजे केंद्रीय मंत्री विभाग / राज्य सरकार / भारताचा केंद्रशासित प्रदेश / कोणतीही संस्थात्मक व्यवस्था/नियमानुसार योजना प्रशासित करण्यासाठी नियुक्त केलेली कोणतीही नोंदणीकृत एनजीओ असा होईल, ग्रामीण भूमिहीन कुटुंबाच्या बाबतीत नोडल एजन्सीचा अर्थ योजनेच्या प्रशासनासाठी नियुक्त राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश असा होईल.

    एल.आय.सी. आम आदमी विमा योजना 2023 आवश्यक कागदपत्र

    या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे असेल

    • सदस्य नोंदणी विहित नमुन्यातील अर्ज आणि त्यावर तलाठी यांची स्वाक्षरी
    • तलाठी यांचे कडील 7/12 उतारा
    • राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स
    • शिष्यवृत्ती विहित नमुन्यातील अर्ज आणि त्यावर मुख्याध्यापक यांची सही
    • अर्जदाराचे आधार कार्ड
    • सरकारी खात्याने दिलेले ओळखपत्र
    • शिधापत्रिका
    • जन्म प्रमाणपत्र
    • शाळेचे प्रमाणपत्र पुरावा
    • मतदार आय डी
    • मोबाइल नंबर
    • पासपोर्ट आकाराचा फोटो 

    एल.आय.सी. आम आदमी योजना 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

    आम आदमी विमा योजना हि भारत सरकारने गरीब सामान्य नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपणाला राज्याच्या समर्पित वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर तुम्हाला अर्जाबद्दल सर्व तपशील मिळतील, या योजनेसाठी ज्या पात्र लाभार्थी नागरिकांना अर्ज करण्याचा आहे त्यांच्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहेत.

    Aam Aadami Vima Yojana

    • सर्वप्रथम आपणाला आयुर्विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल या नंतर आपल्या समोर होम पेज उघडेल.
    • आयुर्विमा महामंडळाच्या वेबसाईट होम पेजवर आपणाला आम आदमी विमा योजना हा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
    • आम आदमी विमा योजना या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्या अर्ज मध्ये विचारलेली संपूर्म माहित तपशिलवार भरा.
    • या योजनेचा अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून, योजनेचा अर्ज सबमिट करा. या प्रमाणे आपली या योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. 

    एल.आय.सी. आम आदमी योजनेंतर्गत ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

    • आम आदमी विमा योजनेंतर्गत पात्र लाभार्थी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने सुद्धा योजनेचा फॉर्म भरू शकतो यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करावे लागेल
    • या योजनेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पात्र लाभार्थी उमेदवारांना आयुर्विमा महामंडळाच्या जवळच्या शाखेत संपर्क करावा लागेल.
    • या नंतर आपल्याला आयुर्विमा कार्यालयात या योजनेसाठी अर्ज भरावा लागेल आणि अर्जाबरोबर आवश्यक असलेली संपूर्ण कागदपत्रे जोडावी लागेल.
    • योजनेसाठी अर्ज भरल्यानंतर आणि अर्जाला लागणारी सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज सबंधित अधिकृत अधिकाऱ्या कडून संपूर्ण तपासून घ्यावा आणि काही चूक झाल्यास ती सुधारून नंतर आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात सबमिट करावा.
    • या प्रमाणे आपली या योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

    महाराष्ट्र आम आदमी योजना 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया

    महाराष्ट्र आम आदमी योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल आणि त्यानंतर तलाठी कार्यालयात जाऊन योग्य व रीतसर भरून त्या बरोबर आवशयक ती संपूर्ण कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय / संजय निराधार योजना / किंवा तलाठी कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल.

    आम आदमी योजना हि महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जाते.  आम आदमी विमा योजना या योजनेचा पात्र लाभार्थी नागरिकांना लाभ मिळवायचा असेल त्यांनी त्यांच्या विभागातील तलाठी कार्यालयात जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी आणि त्याचप्रमाणे पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी आपल्या शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांची मदत घेऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून घ्यावे आणि पुढील प्रक्रीयेसाठी व अधिक माहितीसाठी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा. वाचक मित्रहो. या लेखामध्ये आम आदमी विमा योजने बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपल्यला या योजनेविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन किंवा तलाठी कार्यालयात जाऊन माहिती मिळऊ शकता किंवा महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अधिक माहिती घेवू शकता. मित्रहो आपल्याला हि पोस्ट आवडली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यामतून अवश्य कळवा.

    आम आदमी विमा योजना संपर्क (हेल्प लाईन नंबर)

    ऑफिशियल वेबसाईटClick Here
    AABY हेल्पलाईन नंबरSMS LIC हेल्प 9222492224 / SMS LIC हेल्प 56767877 / 022 - 68 276827


    एल.आय.सी. आम आदमी विमा योजना 2023 FAQ

    Q. आम आदमी योजना काय आहे ?

    महाराष्ट्र आम आदमी विमा योजना हि एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी केंद्र पुरस्कृत योजना आहे हि योजना समाजातील आर्थिक दुर्बल तसेच गरीब सामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक जे आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित नसतात अशा नागरिकांना हि योजाना अडचणीच्या वेळेस आर्थिक मदत पुरविते तसेच या योजनेच्या अंतर्गत विमाधारकास नैसर्गिक मृत्यू तसेच अपघात मध्ये अपंगत्व किंवा मृत्यू यासाठी विमा सुरक्षा दिली जाते.

    Q. आम आदमी विमा योजना कोणासाठी आहे ?

    महाराष्ट्र शासनाने हि केंद्र पुरस्कृत योजना ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकरी आणि शेत मजूर किंवा शहरी भागातील असंघटित कामगार, तसेच योजनेमध्ये निर्धारित केल्यानुसार छोटे व्यावसायी हि योजना या सर्व नागरिकांसाठी आहे हि एक सामाजिक सुरक्षा विमा योजना आहे.

    Q. आम आदमी योजनेची वयोमर्यादा काय आहे ?

    आम आदमी योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन मजुरांसाठी राबविण्यात आली आहे.

    Q. आम आदमी विमा योजनेमध्ये विमा धारकाला किती रक्कम मिळते ?

    महाराष्ट्र आम आदमी योजना 2022 या योजने बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिल्यागेली आहे जसे योजनेंतर्गत मिळणारी धनराशी, यासाठी क्लेम कसा करावा , योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया, संपर्क, हेल्प लाईन नंबर, अधिकृत वेबसाईट या प्रकारची सर्व माहिती दिल्यागेली आहे.

    Q. आम आदमी विमा योजना अंतर्गत अर्ज कसा करावा ?

    या योजने मध्ये नागरिक ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने अर्ज करू शकतात, तुम्हाला  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबपोर्टल वर जावे लागेल किंवा विमा महामंडळाच्या वेबपोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागेल आणि तसेच ग्रामीण भागामधील नागरिक तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊन नोंदणी करू शकतात.

  • महाराष्ट्र आम आदमी विमा योजना अंतर्गत मिळणारे आर्थिक फायदे

Post a Comment

0 Comments