मुख्यमंत्री रोजगार योजना ऑनलाइन अर्ज

 नमस्कार मित्रांनो ,आज आपण मुख्यमंत्री रोजगार योजना (CM Rojgar Yojana Maharashtra) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे मुख्यमंत्री रोजगार योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

देशाचे तसेच राज्याचे प्रगती करण्यासाठी उद्योग उद्योग व व्यवसाय मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात त्यामुळे नवीन उद्योग व्यवसायांना चालना देणे विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने cm rojgar yojana Maharashtra सुरू केली आहे. राज्यांमध्ये सुशिक्षित युवक युवतींचे प्रमाण वाढत आहे. या तरुण-तरुणींना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पाठबळ देणे हिताचे ठरू शकते. केंद्र शासनाद्वारे प्रधािमंत्री रोजगार निर्ममती काययक्रम (PMEGP) योजना उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आधीपासून आहे. परंतु या योजनेचे मर्यादित उद्दिष्ट लक्षात घेऊन तसेच वाढत जाणारे प्रस्ताव यामुळे स्वतंत्र राज्याची योजना तयार केलेली आहे.

cm-rojgar-yojana-maharashtra

योजनेचे उद्दिष्ट

महाराष्ट्र राज्यातील योग्य व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे व स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक मदतीतून उभे करून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये एक लाख सूक्ष्म आणि लघु उपक्रम सुरू करणे. आणि याच माध्यमातून दहा लाख रोजगार निर्मिती करणे. CM Rojgar Yojana Maharashtra योजनेचे अंमलबजावणी करण्यासाठी नोडल संस्था म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अंतर्गत येणारे उद्योग संचालनालय मुंबई ची निवड करण्यात आली आहे. सहयोगी संस्था म्हणून या योजनेअंतर्गत बँका, नोडल बँका, उद्योजकीय प्रशिक्षण संस्था, ऑनलाईन प्रक्रियेसाठी सहाय्यभूत संस्था, अंमलबजावणी संस्था, केंद्र शासनाच्या संस्था यांचे सहाय्य घेण्यात येते. या योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांचे दोन आठवडे कालावधीचे निवासी उद्योजकीय प्रशिक्षण सक्तीचे असते. CM Rojgar Yojana Maharashtra

CM rojgar yojana maharashtra लाभार्थी पात्रता

वयोमर्यादा

कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असेल. जास्तीत जास्त वयोमर्यादा 45 वर्ष. (इतर जाती व आरक्षित कॅटेगिरी साठी पाच वर्षे शिथिल)

शैक्षणिक पात्रता

१. दहा लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण
२. 25 लाखावरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण

एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस कारक या योजनेचा लाभ घेता येईल ( येथे कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती-पत्नी अशी असेल)

अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) अथवा इतर कोणत्या केंद्र अथवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडे अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याने उपक्रम कालावधी म्हणजेच की पुढील पाच वर्षांमध्ये एकूण एक लाख घटक स्थापित करण्याचे नियोजन आहे. ही योजना 2019 पासून सुरू झाली आहे. पहिल्या वर्षी एकूण दहा हजार घटक म्हणजेच की लाभार्थी उद्दिष्ट होते. एकूणउद्दिष्टांच्या 30% उद्दिष्ट महिला प्रवर्गासाठी व 20 टक्के उद्दिष्ट अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठेवण्यात येतील. CM Rojgar Yojana Maharashtra

फायदे व प्रकल्प किंमत

या योजनेमध्ये बँकेकडून मिळणारे कर्ज 60 ते 75 टक्के असेल व अर्जदाराने स्वतःचे भांडवल पाच टक्के ते दहा टक्के गुंतवणे गरजेचे आहे. शासनाच्या आर्थिक सहाय्य अनुदान स्वरूपात (मार्जिन मनी) 15 टक्के ते 35 टक्के असेल. प्रवर्ग व संवर्ग यांच्या नुसार बँक कर्ज, अनुदान व अर्जदाराचे स्व गुंतवणुकीचे प्रमाण खालील दिले आहेत.

घटकांचा प्रवर्ग/ प्रभागघटकांची स्व गुंतवणूकदेय अनुदान (मार्जिन मनी)बँक कर्ज
घटकाचा प्रभागशहरी/
ग्रामीण
शहरी/
ग्रामीण
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक5%शहरी – 25%

ग्रामीण – 35%

शहरी – 70%

ग्रामीण – 60%

उर्वरित प्रवर्ग10% शहरी – 15%

ग्रामीण – 25%

शहरी – 75%

ग्रामीण – 65%

सेवा उद्योग व कृषी पूरक उपक्रमांसाठी उत्पादन प्रकारातील उपक्रमांसाठी प्रकल्प किमती अंतर्गत इमारत खर्च 20 टक्क्यांच्या मर्यादेत असेल तसेच खेळते भांडवल प्रकल्प खर्चाच्या 30% मर्यादित असेल.

अर्ज कसा करावा?

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे सर्वप्रथम तुम्हाला CMEGP या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. त्यानंतर होम पेजवर “online application form for individual” वर क्लिक करा.
  3. पुढील पेजवर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे.
  4. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  5. सर्व माहिती भरून झाल्यावर व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यावर SAVE बटणावर क्लिक करायचे आहे.
  6. अशा पद्धतीने तुम्ही एप्लीकेशन पूर्ण कराल.

Conclusion

मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही मुख्यमंत्री रोजगार योजना (CM Rojgar Yojana Maharashtra) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट ,ती योजना म्हणजे काय इत्यादी. महाराष्ट्रातील तरुण तरुणींना नऊ उद्योग सुरू करण्यासाठी हातभार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. बँकेमधून कर्ज उपलब्ध करून देण्यापासून उद्योगातील प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना मदत करते. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !


Post a Comment

0 Comments